ब्रेकिंग न्युज
लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळे

सांगलीत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान पुरबाधितांचा गोंधळ !

 

सांगली | राज्यात मागच्या महिन्यात मुसळधार पाऊस आणि पुराने कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्राचे मोठ्या प्रमाणात पुराच्या पाण्याने नुकसान झाले होते. त्याच नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सांगलीत दाखल झाले होते. त्यांनी आज सांगलीतील भिलवडीला भेट दिली. दरम्यान, या संकटातून मार्ग काढणारचं, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मुख्यमंत्री बोलत असताना, खाली एका नागरिकाने चांगलाच गोंधळ घातला. तो मुख्यमंत्र्याना मदतीची मागणी करत होता. साहेब मदत करा, चार वर्ष झाले पायात चप्पल घातली नाही, असं तो बोलत होता. यामुळे मुख्यमंत्री बोलतांना अचानक झालेल्या गोंधळुले एकच खळबळ उडाली होती.

तो नागरिक मुख्यमंत्र्याना निवेदन देण्यासाठी आला होता. यावेळी पोलिसांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. ‘मुख्यमंत्री साहेब मी चार वर्ष अनवाणी फिरतोय, मला भेटू द्या, मुंबईत आल्यावर मला पोलीस अटक करतात’, असे म्हणत तो नागरिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न करत होता.

error: Content is protected !!