ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

मराठा महासंघाच्या संभाजीराजे दहातोंडे यांच्याकडे नव्या जबाबदाऱ्या

 

मराठा महासंघाच्या संभाजीराजे दहातोंडे
यांच्याकडे नव्या जबाबदाऱ्य

राज्य संपर्कप्रमुख व उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपद

नगर ; अखिल भारतीय मराठा महासंघामध्ये गेली अनेक वर्ष काम करणारे शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे पाटील यांच्यावर आता महासंघाने नवी जबाबदारी दिली आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीत अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष प्रा. शशिकांत पवार यांनी संभाजीराजे दहातोंडे पाटील यांची राज्य संपर्कप्रमुख तसेच उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी निवड केली आहे यामुळे त्यांच्याकडे आता मराठा महासंघाच्या तीन प्रमुख जबाबदाऱ्या आल्या आहेत.

नगर जिल्ह्यातील चांदा (ता. नेवासा) येथील मूळ रहिवासी असलेले व छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू सरदार माणकोजी दहातोंडे यांच्या वंशातील संभाजीराजे दहातोंडे पाटील गेली वीस ते तीस वर्षापासून अखिल भारतीय मराठा महासंघ आत काम करत आहेत. जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी पाच वर्ष चांगले काम केले आहे. अखिल भारतीय मराठा महासंघात अहमदनगर जिल्हा अध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष, राज्य संपर्कप्रमुख अशा प्रमुख जबाबदाऱ्या संभाळल्या नंतर गेल्या काही वर्षापासून ते महाराष्ट्र राज्य शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष आहेत. शेतकरी मराठा महासंघाच्या माध्यमातून दहातोंडे यांनी राज्यभरात भरीव काम केले आहे. त्यामुळे मराठा महासंघाने त्यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे नुकतीच मुंबईत बैठक झाली या बैठकीत संभाजीराजे दहातोंडे पाटील यांच्यावर राज्य संपर्कप्रमुख तसेच उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी निवड केली आहे यामुळे त्यांच्याकडे आता मराठा महासंघाच्या तीन प्रमुख जबाबदाऱ्या आल्या आहेत. संभाजीराजे दहातोंडे यांच्या निवडीचे राज्यभरात स्वागत केले आहे.

error: Content is protected !!