ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

महिलांच्या सुरक्षेते विषयी सुभेदारी शासकीय विश्राम गृहावर पँथर्स आर्मीची बैठक

फक्त घरावर मातोश्री नाव न ठेवता महाराष्ट्रातील मातोश्रीनां सुरक्षित ठेवा – कामीनी ताई हाडोळे

प्रतिनिधी/अक्षय जाधव

औरंगाबाद :- दिवसादिवस महाराष्ट्रात महिलांवर होत असलेले अन्याय अत्याचार बलात्कार दिवसेंदिवस वाढत आहे.पुणे,बीड,बदनापूर तसेच काल झालेल्या मुंबई साकीनाका या ठिकाणी महिलावर बलात्कार करून तिला निर्दयीपणे रोडवर फेकून दिले.त्या महिलेचा हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

आरोपीला कठोरात कठोर शिक्षा किंवा फाशीची शिक्षा देण्यात यावी. महाराष्ट्रामध्ये महिलांवर मुलींवर बलात्काराचे प्रमाण वाढले आहे, त्याकरिता महाराष्ट्र सरकारला पँथर्स आर्मीच्या वतीने आवाहन आहे की जर महिलांना सुरक्षित ठेवू शकत नसाल तर झालेल्या घटनांची नैतिक जबाबदारी घेऊन आपल्या खुर्चीचा राजीनामा द्यावा व महाराष्ट्रातील महिला व मुलींना शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी जेणेकरून येथील महिला व मुली स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकतील.

घरावर मातोश्री नाव न ठेवता महाराष्ट्रातील मातोश्रींचे ही संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे अशा ठाम भूमिकेत पँथर्स आर्मी च्या महिला जिल्हाध्यक्ष कामिनी ताई हाडोळे यांनी पँथर्स आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर भाई खिल्लारे यांच्या प्रमुख उपस्थितीत आजच्या बैठकीत या सरकारला आवाहन केले आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले मराठवाडा अध्यक्ष अनिल खरे यांनी पदाधिकाऱ्यांना आक्रमक व जागृत होन्याचे आवाहन केले तसेच युपी बिहार नंतर महाराष्ट्र राज्यही युपी बिहारच्या पावलावर पाऊल ठेवत आहे इथे असणारे प्रस्थापित एकमेकांचे पाय ओढण्यात मग्न आहेत तर अनेकांना आपल्या मंत्रिमंडळाचं पडलेला आहे.परंतु आपाआपल्या मतदारसंघात महिलांवर मुलींवर बलात्कार व अत्याचार होत आहे.याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे त्याकरिता महाराष्ट्र सरकारला आव्हान आहे येथील दलित मुस्लिम मागास वर्गीय नागरिकांना महिला व मुलींना सुरक्षा देऊ शकत नसाल तर आपल्या खुर्चीचा राजीनामा द्यावा.

पँथर्स आर्मी आपल्या न्याय हक्कासाठी माय भगिनींसाठी रोडवर उतरल्याशिवाय राहणार नाही असे पँथर्स आर्मी चे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर भाई खिल्लारे यांनी आव्हानं केले.या वेळी या बैठीकीत मराठवाडा अध्यक्ष अनिल खरे,मराठवाडा महासचिव करण जगधने, जिल्हा उपाध्यक्ष अशोक कामीटे,जिल्हा कोष्याधक्ष देवा भालेराव, फुंलब्री तालुका अध्यक्ष अनिल मामा साळवे,युवा जिल्हा अध्यक्ष अनिल त्रिगोटे, शहर अध्यक्ष पूर्व दिनेश मोरे,शहर संघटक पूर्व आनंद जाधव,कामिनी ताई हाडोळे,जिल्हा अध्यक्षा औरंगाबाद पुजाताई चांदणे,जिल्हा उपाध्यक्षा पिंप्रीराजा शाखा अध्यक्षा शशिकला ताई घोरपडे,मिराबाई निकळजे गाढे जळगाव शाखा अध्यक्षा इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!