ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

आजपासून शाळा पुन्हा गजबजणार, शिक्षणोत्सव साजरा होणार,

 

मुंबई | आज राज्यातील शाळा सुरू होणार आहे. या निमित्ताने दुपारी १२ नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ‘माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ या कार्यक्रमांतर्गत सर्व शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांना सुद्धा हा कार्यक्रम दखविण्यात यावा अशा सूचना करण्यात आल्या आहेत. आज शाळेच्या पहिल्या दिवशी शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे यासाठी शिक्षणोत्सव साजरा केला जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा अनौपचारिक स्वागत केले जाणार आहे.

आजपासून ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते इयत्ता १२ वीपर्यंतचे वर्ग भरतील तर शहरी भागात इयत्ता आठवी ते इयत्ता १२ वीचे वर्ग सुरू होत आहेत. राज्य सरकारने शाळांसाठी नवी नियमावली तयार केलीय. राज्य सरकारने शाळांना पहिल्या दिवशी शिक्षणोत्सव साजरा कऱण्यास सांगितलं आहे. तसेच शाईत येणाऱ्या विध्यार्थी वर्गाचे गुल देऊन स्वागत करण्यात येणार आहे.

मुंबईत केवळ आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. कोरोनासंदर्भातले नियम पाळले नाहीत, तर कठोर कारवाईचा इशारा मुंबई महापालिकेनं दिला आहे. मुंबईत तीन तास शाळा भरणारेय. ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.राज्यातील कोविड संक्रमण स्थिती काहीशी निवळल्याने हा निर्णय घेण्यात आला.

error: Content is protected !!