ब्रेकिंग न्युज
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगी

कोल्हापूरचा शाही दसरा कोरोना नियम पाळून साजरा होणार

 

कोल्हापुर | करवीरनगरीचा ऐतिहासिक शाही दसरा सोहळा यंदा परंपरेनुसार आणि कोरोना संसर्गाचे सर्व नियम पाळून साजरा होणार आहे. या संदर्भात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. करवीरच्या छत्रपती घराण्याने शाही दसऱ्यात ऐतिहासिक दसरा चौक येथे साजरा केला जाणाऱ्या सीमोल्लंघनाची परंपरा आजपर्यंत जपली आहे.

मात्र गेल्या वर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा रद्द करीत ऐतिहासिक जुना राजवाडय़ातील तुळजाभवानी मंदिरात प्रतीकात्मकरीत्या साजरा करण्याचे आदेश श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी दिले होते. त्यानुसार मानकऱ्यांच्या उपस्थितीत नागरिकांविना दसऱ्याची परंपरा जोपासली गेली.

यंदा जिह्यात कोरोना संसर्गाचा जोर काहीसा ओसरला आहे. बंद असलेली मंदिरे नवरात्रोत्सवापासून सुरू झाली आहेत. त्यामुळे यंदा शाही दसरा सोहळा होणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दसरा चौकात प्रथेप्रमाणे शाही दसरा सोहळा साजरा होणार आहे. कोरोनाचे नियम पाळून आयोजन करण्यात येणार असल्याचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. नागरिकांनीही सोहळ्यात सहभागी होताना आवश्यक ती काळजी, दक्षता घ्यावी, सोहळा साजरा करण्यासाठी आवश्यक ते नियोजन सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे.

error: Content is protected !!