ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

तरुणांनी कष्टाने उभा केलेल्या उद्योगाचे आज आ धस यांच्या हस्ते उद्घाटन ,मातापित्यांना दिलाय मान

तरुणांनी कष्टाने उभा केलेल्या उद्योगाचे आज आ धस यांच्या हस्ते उद्घाटन ,मातापित्यांना दिलाय मान

पाटोदा । दि ९ ;- तरुणाई ची कष्टातुन उभी राहलेली क्रयशक्ती काय करु शकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही येथिल तीन तरुणांनी स्वहिम्मतीवर उभा केलेले उद्योग विश्व याच उद्योगाचे उदघाटन आ सुरेश धस यांच्या हस्ते होणार आहे तर याचा सन्मान या तरुणांनी माता पित्यांना दिला आहे .
ग्रामीण भागात काहीही उद्योग उभारुन बेकारांना आपण रोजगार ही देऊ शकतो याच ध्येयाने प्रेरीत होऊन .रोजगार हमी योजनेच्या कामावर आई वडिलाबरोबर जाणारे अशोक कोळपकर ,दुसऱ्या च्या जेसीबी वर ऑपरेटर म्हणुन काम करणारे आप्पासाहेब येथिल येवले,मेडिकल दुकानात काम करुन साधी एसटीडी बुथ चालवणारे अनिल काथवटे या तिघांनी एकत्रितपणे येऊन दहा वर्षांपूर्वी खडीक्रेशर प्लँट टाकुन उद्योगास सुरुवात केली .या उद्योगात २०० लोकांना रोजगार मिळवून दिला . या व्यवसायात प्रगती साधत डोंगरकिन्ही परिसरातील गरज ओळखून नविन व्यवसायात उडी घेत आहेत .तिघांच्या एक विचारातुन व कष्टातुन उभे रहात असलेले नवीन व्यवसायाची भर पडत आहे.वामणभाऊ मल्टीपल निधी बँक तसेच माऊली हार्डवेअर या नुतन व्यवसायाचा शुभारंभ आ सुरेशधस यांच्या हस्ते होणार आहे .या महत्वपुर्ण कार्यक्रमात सर्वमानसन्मान या तीन तरुणांनी मातापित्यांना दिला आहे. याच कार्यक्रमात प्रा आ केंद्र डोंगरकिन्ही ,प्रा आ केंद्र नायगाव येथिल कार्यरत डॉ व आरोग्य कर्मचारी आशाताई, अंगणवाडी ताई या कोविडयोध्द्यांचा सत्कारही आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमास पाटोदा तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच ,जि प सदस्य, पंचायत समिती सदस्य,विविध सोसायटीचे चेअरमन, सर्व कर्मचारी, शिक्षक व पत्रकार यांना निमंत्रित करण्यात आले आहे. हा उददघाटनाचा कार्यक्रम दि १० रोजी ठिक दहा वा होणार असुन या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन अनिल काथवटे, आप्पासाहेब येवले, अशोक कोळपकर यांनी केले आहे.
चौकट –
ग्रामीण भागात उद्योग उभारणी करुन रोजगार निर्मिती केली आहे. वामणभाऊ निधी बँकेतुन अर्थिक प्रगती साधली जाणार आहे तर बारा बेरोचगारांना रोजगार निर्मिती होणार आहे .

error: Content is protected !!