ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

जिथे जेवतो तिथला घास पळविण्याची माझी संस्कृती नाही : ना. भरणे

वडाळा येथे झाले विकास कामांचे लोकार्पण.
नागरी सत्कारात पालकमंत्री भावनिक.
काका साठे यांना महामंडळ देण्याची राजन पाटील यांची आग्रही मागणी.
—————————————————-

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – संतोष विभुते

मी सोलापूरचा पालकमंत्री झाल्यानंतर काहींनी सोलापूरच्या वाट्याला आलेले पाणी इंदापूरला पळविण्याचा माझा घाट असल्याचा आरोप केला. पण, सोलापूरचा एक थेंबही नेण्याचा माझा घाट नव्हता. पालकमंत्री या नात्याने या जिल्ह्याशी माझेही काही कर्तव्य आहे, साहजिकच जिथे जेवतो तिथला घास पळविण्याची माझी संस्कृती नसल्याचे सांगून जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे भाऊक झाले.  दरम्यान वडाळा येथे विकास कामांचा लोकार्पण त्यांच्या हस्ते झाला. त्यानंतर आयोजित केलेल्या ना.भरणे व आमदार यशवंत माने यांचा वडाळा ग्रामपंचायतीच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील अध्यक्षस्थानी होते. काका साठे हे ज्येष्ठ नेते असून त्यांना महामंडळ देण्याची मागणी राजन पाटील यांनी यावेळी चांगलीच लावून धरली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, वडाळा गावचे सरपंच व सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे, राष्ट्रवादी काँग्रेस ओ.बी.सी.सेलचे जिल्हाध्यक्ष अविनाश मार्तंडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद, सुनील भोसले, महिला आघाडी तालुकाध्यक्षा सुवर्णा झाडे, राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष बालाजी पवार, उपसभापती जितेंद्र शिलवंत, पंचायत समिती सदस्य हरिदास शिंदे, नसीर जहागिरदार, धामणगावचे सरपंच एस.के.पाटील, निरंजन भूमकर भाऊ लामकाने, हनमंत गाडे, वडाळ्याचे उपसरपंच अनिल माळी, बापूराव साठे, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर गायकवाड, मनोज साठे, विकास गाडे, संपत गाडे, दिलीप जमदाडे, संतोष सुभेदार, रवी मोहिते, किरण कांबळे, दत्तात्रय वीर, पांडुरंग नागणे, ग्रामविकास अधिकारी अनिल शिंदे, प्रकाश गुरव, मल्लीनाथ तंबाके, शिवाजी आवटे, दिपक अंधारे, मंजूर शेख, अमोल पाटील, शिवाजी पाटील, राजाराम गरड, श्रीकांत मार्तंडे, विशाल मार्तंडे,सुभाष शिंदे, पांडुरंग नवगिरे, बबन राठोड, महेश पेंडपाले, रामराव माने, संभाजी गवळी, देविदास रोटे, महादेव पवार, गणेश सुपाते, रतिकांत पाटील यावेळी उपस्थित होते. पदे येतात, जातात परंतु, सत्तेचा वापर हा समाजातील तळागाळातील लोकांसाठी करायचा असतो,याच भूमिकेतून आपण आजवर काम केले असल्याचे ना.भरणे यांनी सांगितले. गेली 50 वर्षांत वडाळा गावाने तोलामोलाची साथ दिली. त्यामुळेच गावचा विकास करु शकलो. उत्तर सोलापूर तालुक्यातील जनतेनेही मला आतापर्यंत मनापासून साथ दिल्यामुळेच राजकारणाचा प्रवास यशस्वी झाला असल्याचे काका साठे यांनी सांगितले. जिल्ह्याला पालकमंत्री व मोहोळ-उत्तर सोलापूरला आमदार हे दोघेही विकासाचा ध्यास असलेले लोकप्रतिनिधी मिळाले. असल्याचे राजन पाटील यांनी सांगितले. रखडलेल्या शिरापूर-आष्टी योजनेसाठी दोन वर्षात 70 कोटी रुपये मिळाले असून उत्तर सोलापूर तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे आ.माने यांनी सांगितले. यावेळी मारुती मंदिर सुशोभिकरण व काँक्रीट रस्त्याचा लोकार्पण सोहळा ना.भरणे यांच्या हस्ते पार पडला. पत्रकार दत्ता मोकाशी यांनी सूत्रसंचालन केले.

error: Content is protected !!