ब्रेकिंग न्युज
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगी

ना. विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये होणार ओबीसी, व्हीजेएनटी समाजाचा एल्गार!

ना. विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये होणार ओबीसी, व्हीजेएनटी समाजाचा एल्गार!

राज्यव्यापी अधिवेशनास ओबीसी, बाराबलुतेदार, आठरा आलुतेदार, एसबीसी, भटके विमुक्त समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – अर्जुन दळे

बीड / प्रतिनिधी;- महाराष्ट्र राज्यातील बाराबलूतेदारांच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व आर्थिक समस्यांवर उपाययोजना संधर्भात विचार विनिमय व धोरण ठरविण्यासाठी राज्यव्यापी पाहिले अधिवेशन मुंबई बांद्रा येथील रंगशारदा सभागृहात दि. २ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजता होणार असून या अधिवेशनास बीड जिल्ह्यातील ओबीसी बाराबलुतेदार, आठरा आलुतेदार, एस.बी.सी., भटके विमुक्त समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बीड जिल्हाध्यक्ष अर्जुन दळे यांनी केले आहे.
    अधिवेशनास राज्याचे ओबीसी कल्याण व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून ते बारा बलुतेदार, अलूतेदार, एसबिसी, मायक्रो ओबीसिंच्या अन्यायग्रस्त जातींच्या संविधानिक न्याय हक्कांसाठी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती अर्जुन दळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली.
        देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झालीत तरी ग्रामीण मजुरी, कौटुंबिक सेवा पुरविणारा, शेती औजारे, कला कौशल्यांची कामे, निवारा, उद्योग क्षेत्रात मिनी इंडस्ट्रीचा पाया ठरलेल्या बारा बलुतेदार धान्य स्वरूपात मोबदल्यावर वर्षानुवर्ष उदरनिर्वाह करत आलेल्या वर्गाच्या समस्या आजही तश्याच पूर्ववत आहेत. त्यांचे दुःख, दारिद्र्य, अवहेलना, अन्याय हे प्रश्न आजही सुटले नाहीत. त्यांची आर्थिक परिस्थिती तर अत्यंत डबघाईची आहे. करोना काळात तर फारच हाल झाले. ह्या वर्गाना सत्तेत सहभागा शिवाय त्यांची आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारण्याबरोबर शिक्षणाचा स्थर उंचावण्यासाठी ठोस उपाय योजनांवर विचारमंथन होणार आहे. तरी राज्यातील सर्व बलुतेदार घटकातील बांधवांनी मुंबई येथील अधिवेशना उपस्थित रहाण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बीड जिल्हा अध्यक्ष अर्जुन दळे यांनी केले आहे.

error: Content is protected !!