ब्रेकिंग न्युज
घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनआरटीईचा घोळ संपला, उद्यापासून भरता येणार ऑनलाइन अर्ज, हा केला महत्वाचा बदलमहाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी 

पुण्यात ओमायक्रॉन: पिंपरीत ६, तर पुण्यात १ रुग्ण

०५ डिसे २०२१
भोसरी :
कल्याण, डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉनचा रुग्ण आढळल्यानंतर आता पुण्यातही ओमायक्रॉचे ७ रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरात १ तर पिंपरी चिंचवडमध्ये ६ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता ८ झाली आहे. त्या सहा जणांपैकी ३ जण नायजेरियाहून आले आहेत तर इतर तिघे त्यांचे संपर्कातील आहेत.

पुणे शहरातील ४७ वर्षीय पुरूषाला या नवीन व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या अहवालाने सिद्ध झाले आहे. पिंपरीमधील सहाही रुग्ण एकाच कुटूंबातील आहे. नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून ४४ वर्षीय महिला तिच्या भावाला पिंपरी चिंचवडला भेटण्यासाठी आली होती. तिच्यासोबत आलेल्या दोन मुली आणि पिंपरी चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ यासह त्याच्या दोन्ही मुली, असे एकूण ६ जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमायक्रॉन विषाणू सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रविवारी संध्याकाळी दिला आहे.

नायजेरियाहून आलेल्या महिलेची आजाराची लक्षणे अत्यंत सौम्य असून इतर ५ जणांना कसलीही लक्षणे नाहीत. हे सर्व रुग्ण सध्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात भरती असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची ४४ वर्षांची महिला तिच्या १२ आणि १८ वर्षांच्या दोन मुलींसह आपल्या भावाला भेटण्यासाठी दिनांक २४  नोव्हेंबर 2021 रोजी पिंपरी चिंचवड येथे आली. त्या तिघींना ओमायक्रॉन विषाणूची बाधा असल्याचे आता सिद्ध झाले आहे.

error: Content is protected !!