ब्रेकिंग न्युज
स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनआरटीईचा घोळ संपला, उद्यापासून भरता येणार ऑनलाइन अर्ज, हा केला महत्वाचा बदलमहाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळे

आता आपल्या शेजारी असलेल्या जिल्ह्यात ओमिक्रॉनचा शिरकाव ;

आता आपल्या शेजारी असलेल्या जिल्ह्यात ओमिक्रॉनचा शिरकाव ;

उस्मानाबाद (प्रतिनिधी) :-कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरियंटने उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश केला असून पहिल्याच दणक्यात बावी येथील २ रुग्ण ओमियक्रॉन पॉझेटिव्ह आढळले आहेत. दोन रुग्णांना ओमिक्रॉनचे रुग्ण आढळल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून बावी गावात चिंतेचे वातावरण आहे. दुबईतील शारजा येथून आलेल्या ४२ वर्षीय व्यक्तीसह मुलालाही ओमिक्रॉनची बाधा झाली आहे.

महाराष्ट्रात परदेशातून प्रवास करुन आलेल्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी करुन त्याची वैद्यकीय चाचणी केली जात आहेत. ओमिक्रॉनमुळे राज्यातील आरोग्य यंत्रणाही अॅक्टिव्ह झाली आहे. विदेशातून राज्यात आलेल्या नागरिकांची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात येत आहे.

उस्मानाबाद जिल्हयातील बावी येथे आढळलेला पॉझिटिव्ह संशयित रुग्ण आढळून आला होता. शारजा दुबई येथुन तो भारतात आल्यानंतर त्याची विमानतळावर तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी त्याची चाचणी निगेटिव्ह आली. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात आल्यानंतर त्याची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली होती. स्थानिक प्रशासनाने याची दखल घेत प्रशासनाने स्वॅबचे ५ नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठवले होते.

कोरोना पॉझिटिव्ह असला तरी तो ओमिक्रॉनचा रुग्ण आहे का? याची तपासणी यातून होणार होती. ६ दिवसानंतर रिपोर्ट आला अशी माहिती प्रशासनाकडून सांगण्यात आली आहे. दरम्यान बावी गावात संशयित रुग्णा पासून फैलाव होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. गावातील परिसर सील करण्यात आला.

बावी गावच्या सीमा प्रशासनाने बंद केल्या असून कलम १४४ लागू करण्यात आले आहे. उप विभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी हे आदेश काढले आहेत. शारजा येथून आलेल्या कोरोना पाँझेटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले व्यक्तीची तपासणी केली जात आहे. दरम्यान, रुग्ण दुबई येथून आल्यानंतर गावात गाठीभेटी घेत फिरला होता त्यामुळे त्याच्या संपर्कातील लोकांचा शोध घेत आहेत. रुग्णाच्या संपर्कातील १३ व २० वर्षीय दोन व्यक्ती करोना पॉझेटिव्ह निघाल्याने प्रशासन सतर्क झाले होते. बावी गावा पासुन ३ किमी अंतर रेड झोन तर ७ किमी अंतर बफर झोन जाहीर करण्यात आला आहे.

error: Content is protected !!