ब्रेकिंग न्युज
जामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनआरटीईचा घोळ संपला, उद्यापासून भरता येणार ऑनलाइन अर्ज, हा केला महत्वाचा बदलमहाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

राज्यात ओमायक्रॉनचा धोका वाढला

राज्यात ओमायक्रॉनचा धोका वाढला

मुंबई(प्रतिनिधी) : महाराष्ट्रासाठी आताची सर्वात मोठी आणि तितकीच चिंता व्यक्त करणारी बातमी आहे. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा विळखा वाढत चालला आहे. राज्यात आज आणखी नवे 11 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले. यापैकी 8 रुग्ण मुंबई विमानतळावरील तपासणीत आढले असून पिंपरी-चिंचवड, उस्मानाबाद आणि नवी मुंबईत प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे.
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार आज आढळलेल्या अकरा रुग्णांमुळे महाराष्ट्रात आता ओमायक्रॉनच्या एकुण रुग्णांची संख्या 65 इतकी झाली आहे.
यापैकी 34 रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.
आज आढळलेल्या रुग्णांची माहिती
मुंबईतील 8 रुग्ण हे विमानतळावरील सर्वेक्षणातून आढळले आहेत. यात केरळ, गुजरात आणि ठाणे इथले प्रत्येकी 1 रुग्ण आहेत. तर इतर पाच जण हे मुंबईतील आहेत. यामध्ये 18 वर्षांखालील दोन मुलं आहेत. 18 वर्षाखालील मुलं वगळता इतर सर्वांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे. सर्व रुग्ण हे लक्षणं विरहित सौम्य गटातील आहेत.
आठ रुग्णांपैकी 2 जण युगांडा इथून, इंग्लंडमधून 4 जण तर दुबई इथून 2 जण भारतात आले आहेत.
दरम्यान, उस्मानाबाद मधला याआधी ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या रुग्णाची 13 वर्षांची निकटसहवासित मुलगी आज ओमायक्रॉन बाझित आढळली. तिला कोणतीही लक्षणं नाहीत. तर केनियावरुन हैदराबाद मार्गे आलेला नवी मुंबई इथला एक 19 वर्षांचा युवक ओमायक्रॉन बाधित आढळला आहे. त्याचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे.
कोणत्या ठिकाणी किती रुग्ण
राज्यात आतापर्यंत 65 रुग्ण आढळले असून यापैकी सर्वाधिक 30 रुग्ण मुंबईतील आहेत. पिंपरी-चिंचवड 12, पूणे ग्रामीण 7, पुणे मनपा 3, सातारा 3, कल्याण-डोंबिवली 2, उस्मानाबाद 3, बुलडाणा 1, नागपूर 1 लातूर 1, वसई-विरार 1 आणि नवी मुंबई 1 रुग्ण आढळला आहे.

error: Content is protected !!