ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

अंधांच्या ब्रेल लिपीचा जनक लुई ब्रेल यांच्या जयंतीनिम्मित नवजीवन दिव्यांग निराधार संस्थेमार्फत ‘ दिव्यांग तसेच निराधार ‘ नागरिकांना ब्लॅंकेट तसेच जगण्याचा मार्ग पुस्तिकाचे वाटप.

दिव्यांग,निराधार नागरिकांना भोजन ब्लॅंकेट वाटप.

प्रतिनिधी/जयश्री एडके.

पुणे/पिंपरी चिंचवड :-(५जाने) काळभोरनगर चिंचवड येथील
नवजीवन दिव्यांग निराधार संस्थेमार्फत दिव्यांग तसेच निराधार नागरिकांना थंडीच्या बचाव पासून ब्लॅंकेट, मार्गदर्शक पुस्तिका (जगण्याचा मार्ग) याचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे यावेळी उदघाटक प्रा.दिपक जाधव म्हणाले की,आज अंधांच्या ब्रेल लिपीचा जनक लुई ब्रेल याची जयंती आहे.त्याने उठावदार लिपी तयार केली,तो फ्रान्समधील होता.या लिपीद्वारे अंध व्यक्ती हाताच्या बोटांनी उठाव टिंबांना स्पर्श करून लिपीतील लेखन वाचू शकले.अठराव्या शतकात व्हॅलेंटाइन हॉई ह्या फ्रेंच अंधशिक्षकास उठावदार लिपीतील अक्षरे अंधांना वाचता येतील, ही गोष्ट आढळून आली.या कार्यक्रमास आलेल्या सर्व नागरिकांनां भोजन देण्यात आले.

सदरचा कार्यक्रम नवजीवन दिव्यांग निराधार संस्थेचे अध्यक्ष राहुल बिराजदार,उपाध्यक्ष स्वप्नील पवार,सचिव महादेव पवार,खजिनदार महेश केंद्रे, कार्यकारणी सभासद शबाना शेख, उमाकांत पाठक, सुरज जगदाळे, अमित आंग्रे, जुनेद शेख, अमोल सोनवणे, दीपक जाधव सर, रामकिसन (आप्पा ) केंद्रे, बंटी तुपे, प्रशांत सोनवणे, यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे कामगार नेते अनुप मोरे, सामाजिक कार्यकर्ते अजय काळभोर, अजित शितोळे, तसेच नगरसेवक शैलेश भाऊ मोरे, सामाजिक कार्यकर्ते विजय गुप्ता, सामाजिक कार्यकर्ते,करीम शेख यांचे मोलाचे योगदान लाभले.

सदरील कार्यक्रमांमध्ये कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले होते,आणि टप्प्या टप्प्याने ४०० लोकांना याचे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम किसन केंद्रे आभार प्रदर्शन राहुल बिराजदार यांनी केले.

error: Content is protected !!