ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

मार्डी, सेवालालनगर येथील दुर्घटनाग्रस्त कुटुंबाची मा. आमदार दिलीप माने यांनी घेतली सांत्वन भेट

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – संतोष विभूते

पाण्यासाठी शेततळी विहीर खोदताना सुरक्षितेसाठी कपौंड देखील आवश्यक – दिलीप माने

शेतळ्यातील प्लास्टिक कागदामुळे पोहता येत असले तरी वरती चढता येत नाही. त्यामुळे आता पाण्यासाठी विहीर,शेततळी करताना शेतकऱ्यांनी सुरक्षिततेसाठी कपोंड करणे देखील आवश्यक आहे तर भविष्यात अश्या घटना घडणार नाहीत.असे माजी आमदार दिलीप माने यांनी सांगितले.
मार्डी तालुका उत्तर सोलापूर येथील शेततळ्यातील पाण्यात पडून तीन मुलींचा मृत्यू झाला.सेवालालनगर येथील वडजे व मार्डी येथील सोनार या कुटुंबाचे माजी आमदार दिलीपराव माने यांनी भेटुन सात्वंन केले.
यावेळी त्यांनी सुरक्षितेविषयी चर्चा केली.पाणी बचतीसाठी विहीर, शेततळी,इंधन विहीरीव्दारे पाणी साठवण करण्याची जशी जागृती झाली तशी सदर ठिकाणी संरक्षणासाठी कपौंड, काटेरी कुंपन अश्या माध्यमातून दक्षता घेतली तर असे दुदैवी घटना घडणार नाहीत.या कुंटुबीयावर मोठा आघात झाला असून शासनाच्या व पालकमंत्री यांच्याकडुन लवकर शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन असे माने यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्या समवेत बाबासाहेब पाटील, अँड.इंद्रजित पाटील, मनोहरभाऊ जगताप, नामदेव गवळी, अरूण मुडके, अँड.अजित पाटील, संजय वडजे, पृथ्वीराज राठोड,विष्णु जगताप,सुधीर गवळी, शिवाजी सोनार,विष्णू जगताप, युवराज जगताप, अशोक ईनामदार,संजय ईनामदार,आदि उपस्थित होते . मार्डीचे बापु काटे यांच्या मातोश्रीचे निधन झाले.त्यांच्या घरी माने यांनी भेटुन कुंटुबीयाचे सांत्वन केले. त्यांच्यासमवेत प्रविण काटे, प्रभाकर फुलसागर, भैरू अकाेलकर, आदि उपस्थित होते

error: Content is protected !!