ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा डीजेच्या तालावर ठेका; कोरोना नियमांचा विसर

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै .महाराष्ट्र सूर्योदय

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा डीजेच्या तालावर ठेका; कोरोना नियमांचा विसर

बीड(प्रतिनिधी):- राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख वाढत आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली असल्याची चर्चा सध्या आहे. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा काही निर्बंध लागू केले आहेत. मात्र, तरीही काही ठिकाणी अजूनही करोनाच्यया नियमांचा उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. बीड जिल्ह्यातही असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी डीजेच्या तालावर थिरकत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावेळी कर्मचाऱ्यांनी मास्क ना सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचा फज्जा उडवला.

बीड जिल्ह्यात कमी झालेले कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. जिल्हा प्रशासनाने काही निर्बंध लादले आहेत. मात्र असं असताना बीडमधील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी, चक्क डीजेच्या तालावर ठेका धरला. यावेळी कर्मचाऱ्यांनी बेभान होऊन कोरोनाचे नियम पायदळी तुडवले गेले. यावेळी एकाच्याही तोंडाला मास्क नव्हते, तर सोशल डिस्टनसिंगचा अक्षरशः फज्जा उडाला होता.

बीडच्या कपिलधार परिसरात ट्रेकिंगच्या नावाखाली अधिकाऱ्यांकडून हुल्लडबाजी करत भर रस्त्यात डीजेच्या तालावर नृत्य करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नियम नाहीत का? नियम फक्त सामान्यांना आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी व महावितरणचे वरिष्ठ अधिकारी या नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

error: Content is protected !!