ब्रेकिंग न्युज
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !

सोनार व वडजे कुटुंबियांना “विद्यार्थी सानुग्रह अनुदान” योजनेतून मदत करणार- सभापती रजनीताई भडकुंबे

सोलापूर संपादक महेश पवार

प्रतिनिधी – संतोष विभूते

उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभापती रजनी भडकुंबे व गटविकास अधिकारी प्रशांत देशमुख यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील कु पुजा गरड(सोनार), कु सानिका गरड(सोनार) या दोन्ही सख्या बहिणीचा व सेवालालनगर येथील आकांक्षा वडजे या मुलींचा बुधवार(दि ५) रोजी शेततळ्यात पडून तीन मैत्रीणचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या दोन्ही कुंटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले व “विद्यार्थी सानुग्रह अनुदान” मिळवून देण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्याच्या सुचना करून सर्वतोपरी शासकीय मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.
यावेळी गटशिक्षणाधिकारी बापूराव जमादार,सरपंच अविनाश मार्तंडे, महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक राजशेखर मैत्री सर,सुजित इनामदार सर, शिवाजी सोनार,विष्णू जगताप, हजुलाल जहागिरदार, सिद्राम सोनार, आण्णा सोनार,
सेवालालनगर माजी सरपंच संजय वडजे,युवराज वडजे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!