ब्रेकिंग न्युज
आमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

एसटी चालकाने चक्क मद्यप्राशन करून बस चालवल्याचा धक्कादायक प्रकार आला समोर

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै. महाराष्ट्र सूर्योदय

एसटी चालकाने चक्क मद्यप्राशन करून बस चालवल्याचा धक्कादायक प्रकार आला समोर

हिंगोली(प्रतिनिधी):- राज्यात सध्या एसटी महामंडळाचे आंदोलन सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा मुद्दा पेटलेला असताना हिंगोलीच्या कळमनुरी आगारातील एका एसटी चालकाने चक्क मद्यप्राशन करून बस चालवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता या बस चालकाविरुद्ध हिंगोली आगारांमध्ये तक्रार करण्यात आली आहे.
एसटी चालकाच्या जेवणाच्या डब्यातील दारूच्या बॉटलदेखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आंदोलनादरम्यान एसटी चालक कामावर रुजू होत नसल्यामुळे खासगी वाहन चालकांच्या ताब्यात एसटीचे स्टेरिंग देऊ नये अशी मागणी एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून होत आहे. मात्र अशी मागणी करणारे जीएसटी कर्मचारी मद्य प्राशन करून त्यांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये खासगी प्रवाशांच्या बस मधील ड्रायव्हरला फिट आल्यामुळे प्रसंगावधान दाखवत एका महिलेने स्टेरिंगचा ताबा मिळवत चालकाला रुग्णालयात दाखल करुन प्रवाशांनासुद्धा त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवलं. दुसरीकडे मात्र एसटी महामंडळाचे कर्मचारी कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करत असल्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ करीत आहेत.

error: Content is protected !!