ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

अशोक चव्हाणांच्या बंगल्यासमोर मराठा मोर्चाच्या समन्वयकांचा आक्रोश ; आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून अटक.

अशोक चव्हाणांच्या बंगल्यासमोर मराठा मोर्चाच्या समन्वयकांचा आक्रोश ; आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून अटक.

🔸अशोक काळकुटे | संपादक

मुंबई_ मंत्री अशोक चव्हाण यांच्या बंगल्यासमोर आज सकाळी ०९:३० च्या दरम्यान मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख समन्वयक निवेदन देण्यासाठी पोहोचले होते. यादरम्यान त्यांना आत जाण्यापासून रोखण्यात आल्यानंतर त्यांनी बंगल्यासमोरच ठिय्या मांडत घोषणाबाजी देखील केली. यावेळी पोलीसांनी त्यांना बळाचा वापर करून अटक केली आहे.
आज दि.१९ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ०९:३० च्या दरम्यान मराठा क्रांती मोर्चाचे काही समन्वयक मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमिती चे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या बंगल्यावर निवेदन देण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांना आत जाण्यापासून रोखण्यात आले त्यानंतर समन्वयकांनी आक्रमक होत बंगल्यासमोर ठिय्या मांडत घोषणाबाजी केली. अनेक वेळ हा संपूर्ण गोंधळ त्याठिकाणी सुरू होता.
यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली असुन मलबार हिल पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आले आहे.

▪️▪️
आम्ही आज मराठा आरक्षण उपसमिती चे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना निवेदन देण्यासाठी गेलो असता आम्हाला अडवण्यात आले. यामुळे आम्ही त्याठिकाणी घोषणाबाजी केली. यानंतर आम्हाला पोलिसांनी बळाचा वापर करून अटक केली आहे. दरम्यान मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात अन्यथा अशोक चव्हाणांना अध्यक्ष पदावरून हटविण्यात यावे अशी आमची मागणी आहे.

-गंगाधर काळकुटे (मराठा क्रांती मोर्चा, राज्य समन्वयक)

▪️▪️
अशोक चव्हाणांना जर मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करता येत नसतील तर त्यांनी सरळ-सरळ मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा. एवढ्या दिवसात एकही मागणी त्यांना पूर्ण करता आलेली नाही अशोक चव्हाणांनी मराठा समाजाचा घात केला असुन त्यांनी तात्काळ राजीनामा देऊन प्रशासकीय यंत्रणेतील सक्षम व्यक्तीकडे हे अध्यक्ष पद द्यावे.

– आप्पासाहेब कुडेकर (मराठा क्रांती मोर्चा, राज्य समन्वयक)

error: Content is protected !!