ब्रेकिंग न्युज
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !

गुळवंची येथे हिंदुहृदयसम्राट, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विकासकामांचा शुभारंभ करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी….

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – संतोष विभूते

उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे गुळवंची गावात हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख,माननीय बाळासाहेब ठाकरे यांची 96 वी जयंती माजी पोलिस उपनिरीक्षक दादासाहेब नवगिरे व शिवसेना उपतालुका प्रमुख संजय पौळ यांच्या शुभहस्ते करण्यात आली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुळवंची येथील प्रभाग क्रमांक 3 मध्ये विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी शिवसेनेचे अतुल भवर, शिवसेना विभाग प्रमुख सचिन घोडके, गावचे सरपंच विष्णु भोसले, उपसरपंच सागर राठोड, ग्रामपंचायत सदस्य दिनकर जगताप,ग्रामपंचायत सदस्य त्र्यंबक इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवसेना उपतालुका प्रमुख संजय पौळ यांनी “हिंदुहृदयसम्राट,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो” -.”शिवसेना जिंदाबाद”आशा घोषणा देत सारा परिसर दणाणून गेला. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
गुळवंचीत प्रभाग क्रमांक 3 मधील दलित वस्तीमधील हायमास्टचे लोकार्पण गावांतील ज्येष्ठ व्यक्ती धनाजी (बुवा) कोरके तसेच गावचे मुस्लीम समाजसेवक,कबीर शेख यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी गावचे पोलिस पाटील तानाजी यादव,गावचे माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष महावीर भोसले, युवासेनेचे अभिषेक पवार, महाविद्यालयाचे पुजारी सर,काळे सर, आतकरे सर, ज्येष्ठ नेते प्रशांत पौळ, युवा नेते आबासाहेब शिंदे, संजय गवळी, बब्रुवान माने, शशिकांत आतकरे, हमू बोराडे,अच्युत कदम,विनोद शिंदे, तात्या भोसले,कब्बीर शेख,नरेंद्र प्रधाने,काशिनाथ नवगिरे, राजेंद्र नवगिरे,ईश्वर दिवाण, अरविंद नवगिरे, धनाजी शिंदे,मोहन शिंदे, आबासाहेब अर्जुन,दत्तू इंगळे,ग्रामपंचायत कर्मचारी अमोल बोराडे, विश्वजित देशमुख यांसह गावातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते….

error: Content is protected !!