ब्रेकिंग न्युज
आमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

सोलापूर ग्रामीण पोलीसांनी सलग दुस-या महिन्यात राज्यस्तरीय “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” साठी मिळविले बक्षीस . . .

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – संतोष विभूते

पोलीस महासंचालक,महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालयाकडून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधून मा.न्यायालयाकडून शिक्षा लागलेल्या प्रकरणातून एका प्रकरणाची निवड “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” या बक्षीसाकरीता प्रत्येक महिन्यामध्ये करण्यात येत असते. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रत्येक महिन्यात शिक्षा लागलेल्या निवड प्रकरणांचे प्रस्ताव मागविण्यात येत असतात. त्यातून गुन्ह्याचा तपास व शिक्षा लागण्यासाठी केलेले सर्वोच्च प्रयत्न या निकषांच्या आधारे एका गुन्ह्याची निवड या बक्षीसाकरीता करण्यात येवून त्यास २५ हजार रुपये रोख रक्कम व प्रशिस्तीपत्र देण्यात येत असते.                 माहे डिसेंबर २०२१ करीता मंद्रुप पोलीस ठाणे गुरनं ३६/२०२१. भा.द.वि.क. ३७६ (२), ३०७,३९४ वगैरे व पोस्को कायदा कलम ४.६.८ व १२ प्रमाणे या गुन्ह्यात आरोपीस जन्मठेपेची शिक्षा लागल्याने त्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर गुन्ह्याची डिसेंबर २०२१ या महिन्याकरीता राज्य स्तरावर “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” या बक्षीसासाठी निवड करण्या आलेली असून सदर गुन्ह्याचे तपासी अंमलदार सपोनि नितीन थेटेे व त्यांच्या तपास पथकातील सहा.फौ विजयकुमार जाधव, पोना अविनाश पाटील यांना २५ हजार रुपये रोख रक्कम व प्रशिस्तीपत्रक जाहीर करण्यात आले आहे.                           तसेच जानेवारी २०२२ करीता अक्कलकोट दक्षिण पालीस ठाणे गु.र.नं. २७२/२०१८ भा.द.वि.क.३०२, २०१,३४ या गुन्ह्यात देखील एकूण चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्याने प्रस्ताव पाठविण्यात आला होता. सदर गुन्ह्याची देखील जानेवारी २०२२ या महिन्याकरीता राज्य स्तरावर “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्ध” या बक्षीसासाठी निवड करण्यात आलेली असून सदर गुन्हा उघडकीस आणनारे सपोनि हेमंत भंगाळे व त्यांच्या तपास पथकातील सहा.फौ खाजा मुजावर, पोह नारायण गोलेकर व पथकास २५ हजार रुपये रोख रक्कम व प्रशिस्तीपत्रक जाहीर करण्यात आले आहे.

सलग दोन महिन्यामध्ये सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील शाबीत गुन्ह्यात “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्ध” हे बक्षीस मिळाल्याबावत मा. श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक व मा. श्री. हिंमत जाधव, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी बक्षीसपात्र अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले असून सदरचे प्रशिस्तीपत्रक व रक्कम संबंधीताना लवकरच सन्मानपूर्वक बहाल करण्यात येणार आहे. तसेच मागील महिन्यात लागलेल्या दोन शाबीत गुन्ह्याचे प्रस्ताव देखील पाठविण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले आहे.

error: Content is protected !!