ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

महाराष्ट्रात लवकरच कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

महाराष्ट्रात लवकरच कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता

मुंबई(प्रतिनिधी) :- महाराष्ट्रात लवकरच कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता आहे. जगभरात कोरोनाबद्दल जे घडतंय त्यावरुन हा अंदाज वर्तवला जातोय. कोरोना गेला या भ्रमात राहून तुम्ही मास्क नीट घालणं सोडून दिलं असेल तर वेळीच सावध व्हा. कारण महाराष्ट्रावर कोरोनाच्या चौथ्या लाटेचं संकट आलंय. पाहुया महाराष्ट्रात कधी येऊ शकते कोरोनाची चौथी लाट.

चीन, दक्षिण कोरिया आणि युरोपीय देशांमध्ये कोरोना वेगानं वाढतोय. ओमायक्रॉन आणि त्याचा सबव्हेरियंट BA2 नं पुन्हा थैमान घालायला सुरुवात केली आहे. युरोपीय देशांमध्ये एका दिवसातच ६ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळलेत.

महाराष्ट्रात सध्या रोज दोनशे ते अडीचशे रुग्ण आढळतायत, पण पाहता पाहता हा आकडा वाढू शकतो. महाराष्ट्रात आणि भारतात जूनच्या आसपास कोरोनाची चौथी लाट येईल, असा अंदाज IITकानपूरनं वर्तवलाय. तीन ते चार महिने ही चौथी लाट राहील, असाही अंदाज आहे.

त्यामुळे मास्कमुक्ती तर विसराच पण इतर सर्व नियम पाळून कोरोनापासून सावध राहा, असा इशारा आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे. तर चीन, दक्षिण कोरिया आणि युरोपसह जगभरातच कोरोना वाढत असल्यामुळे खबरदारीचा इशारा WHO नंही दिलाय.

जगभरात का वाढतोय कोरोना?

ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरियंटमुळे जगभरात कोरोना वाढू लागलाय. इस्राईलमध्ये BA 1 आणि BA 2 मिळून आणखी एक नवा व्हेरियंट सापडलाय.हे नवनवे व्हेरियंट किती धोकादायक आहेत, यावर अभ्यास सुरू आहे. कोरोनाचा संपूर्ण खात्मा व्हायला अजून बराच काळ जाणार आहे. त्यामुळे बेफिकीर होऊ नका आणि आरोग्याची काळजी घ्या.

error: Content is protected !!