ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

राणा दाम्पत्याच्या अटकेवरून“…एवढीच तुमची मदुर्मकी?” सरकारला देवेंद्र फडणवीसांचा सवाल

 

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

राणा दाम्पत्याच्या अटकेवरून“…एवढीच तुमची मदुर्मकी?” सरकारला देवेंद्र फडणवीसांचा सवाल

मुंबई(प्रतिनिधी):-खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना आज(शनिवार) खार पोलिसांनी अटक केली आहे. या दामप्त्याची आजची रात्र पोलीस ठाण्यातच जाणार आहे. त्यांच्यावर पोलिसांनी कलम १५३ (अ) अंतर्गत कारवाई करत, गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय आणखी काही कलमं देखील लावण्यात आलेले आहेत. उद्या त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. या अटकेच्या कारवाईवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

“महाराष्ट्रातील घटना व्यथित करणार्‍या आहेत. भाजपाच्या पोलखोल रथावर हल्ले : आरोपी अटकेत नाही, मोहित भारतीय यांच्यावर हल्ला : साधा गुन्हा दाखल नाही, महिला लोकप्रतिनिधीला २० फूट गाडण्याची भाषा : साधी दखल सुद्धा नाही, हनुमान चालीसा पठणाला राणा दाम्पत्य येतात तर : थेट अटक” असं फडणवीसांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

तसेच, “इतकी दंडुकेशाही? इतका अहंकार? इतका द्वेष? सत्तेचा इतका माज? सरकारच करणार हिंसाचार एवढीच तुमची मदुर्मकी?” असा सवाल देखील फडणवीसांनी ठाकरे सरकारला केला आहे.

इतकी दंडुकेशाही ❓
इतका अहंकार❓
इतका द्वेष❓
सत्तेचा इतका माज❓
सरकारच करणार हिंसाचार
एवढीच तुमची मदुर्मकी❓

सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या
पण, जनता सारे काही पाहते आहे !
निव्वळ लज्जास्पद

लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपला?
लोकशाहीचे गार्‍हाणे गाणारे आज सोयीस्कर गप्प का?

याचबरोबर, “सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या पण, जनता सारे काही पाहते आहे! निव्वळ लज्जास्पद. लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपला? लोकशाहीचे गार्‍हाणे गाणारे आज सोयीस्कर गप्प का?” अशा शब्दांमध्ये फडणवीसांना ठाकरे सरकारला एकप्रकारे इशारा दिला आहे.

error: Content is protected !!