ब्रेकिंग न्युज
आमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

राजकारणातील मोठी घडामोड -मनसेचं एकला चलो नव्हे तर साथ चलो, भाजपसोबत युतीची लवकरच होणार घोषणा – सूत्र

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

राजकारणातील मोठी घडामोड -मनसेचं एकला चलो नव्हे तर साथ चलो, भाजपसोबत युतीची लवकरच होणार घोषणा – सूत्र

मुंबई (प्रतिनिधी):- राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. राज्यात भाजप (BJP) आणि मनसे (MNS)ची युती होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप मनसे युतीला संघाने हिरवा कंदिल दाखवल्याची माहिती आहे.

येत्या 5 जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौरा करणार आहेत. त्यानंतर 6 जूनला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

यानंतर 14 जूनला युतीची औपचारिक घोषणा होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजप-मनसेची जवळीक
गेल्या काही दिवसांत भाजप आणि मनसेची जवळीक वाढताना दिसत आहे. भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. मनसेने भोंग्याचा मुद्दा हाती घेतल्यानंतर राज्यातील राजकारण कमालीचं तापलं आहे. मनसेच्या भूमिकेला भाजपनेही पाठिंबा दिल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात मनसे आणि भाजप एकत्र येणार अशी चर्चा सुरु आहे. या चर्चेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

भाजपची बूस्टर डोस सभा
1 मे रोजी औरंगाबादेत राज ठाकरे यांची सभा होणार आहे, तर भाजपनंही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेची घोषणा करण्यात आलीय. मुंबईतल्या सोमय्या मैदानावर ही सभा होणार असून या सभेला बुस्टर डोस सभा असं नाव देण्यात आलंय. अर्थात हा बुस्टर डोस ठाकरे सरकारला घेरण्यासाठी आणि राज ठाकरेंना ताकद देण्यासाठीच असेल हे उघड आहे.

error: Content is protected !!