ब्रेकिंग न्युज
आमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा; वर्षभरासाठी बंद करण्यात आलेली ही योजना पुन्हा सूरू करण्याचा सरकारने घेतला निर्णय

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा; वर्षभरासाठी बंद करण्यात आलेली ही योजना पुन्हा सूरू करण्याचा सरकारने घेतला निर्णय

 

मुंबई(प्रतिनिधी) :-  शेतकऱ्यांना अस्मानी आणि सूलतानी संकटाचा दरवर्षीच सामना करावा लागतो. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत असतो. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकार नेहमीच विविध योजना आणत असते. आता वर्षभरासाठी बंद करण्यात आलेली ही योजना पुन्हा सूरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

बिहार सरकारने गेल्या वर्षी बंद केलेली योजना पुन्हा सूरू करण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी सरकारने 100 कोटींचा प्लान ही बनवला आहे. या योजनेतर्गंत आता सरकारी तिजोरीतून 80 मशिन्स खरेदीवर शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे.

शेतीच्या यंत्रांवर अनुदान देण्याची योजना गेल्यावर्षी बंद केल्यानंतर आता ती पुन्हा एकदा सूरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्राकडूनही शेतकऱ्यांना अनेक लाभ मिळत आहेत, मात्र तरीही शेतकरी आर्थिक संकट काय कमी होत नव्हतो.

त्यामुळे राज्य सरकारतर्फे सुद्धा जूनी योजना सूरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आताच्या या योजनेत फक्त अनुदानच मिळणार असे नाही आहे, तर यंत्रांची संख्या देखील 80 करण्यात आली आहे. तर खर्चाच्या 50% अनुदान म्हणूनही दिले जाणार आहे.

नवीन मशीन्समध्ये, सरकारचा सर्वात जास्त भर जमीनीवर काम करणाऱ्या व शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्यावर आहे. याशिवाय ऊस गाळप यंत्रावरही अनुदान दिले जाणार आहे.

उद्यानाशी संबंधित काही नवीन उपकरणांचाही यावेळी अनुदान यादीत समावेश करण्यात आला आहे.विशेष म्हणजे नवीन योजनेत शेतकऱ्यांना नवीन यंत्राबाबतची ट्रेनिंगही देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

error: Content is protected !!