ब्रेकिंग न्युज
अनाधिकृत होर्डिंग्ज धारकांना सीईओ निता अंधारे यांचा वरदहस्त; उपायुक्त नगरपरिषद प्रशासन संचनालयाला तक्रार:- डॉ.गणेश ढवळेमाजी आ.मुंडेच्या उपस्थिती होळकर जंयती साजरीपशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन  पदविका, येथे दूध जागृती अभियान संपन्न बियाणे चढ्या दराने विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल करणार:- राजेंद्र आमटे विठ्ठल चौकटे लिखीत पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्नपालकांनी मुलांना मोबाईल न देता मैदानी खेळाकडे न्यावे :- गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवेशासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेस सुरवातमा. आमदार अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम ..पत्रकार संघाचे नवनिर्वाचित पदाधिकारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपनबीड जिल्ह्याच्या तीव्र पाणी टंचाईवर आणि जनावरांच्या चाऱ्याची जिल्हाधिकारी यांनी तातडीने उपाय योजना कराव्यात-जगताप, मुळूक

शालार्थ आयडीचा प्रस्ताव प्रलंबित असल्याने अनिता मानसिंग राठोड यांचे मुख्याध्यापक व प्रशासना विरोधात आमरण उपोषण

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – अफजल शेख

अनिता मानसिंग राठोड उपशिक्षिका महासिध्द प्राथमिक शाळा, भंडारकवठे, ता. द. सोलापूर, जि. सोलापूर येथे कार्यरत असून त्यांना मान्यता जा.क्र. मिळालेली आहे. परंतु कोणतेही वेतन व भत्ते चालू नाहीत कारण शालार्थ आयडी नंबर नाही. शालार्थ आयडी मिळावा म्हणून प्रस्तावावर मुख्याध्यापक यांनी सही करून पाठवावा म्हणून पत्रान्वये कळविले आहे. सदरच्या प्रस्तावावर मुख्याध्यापकांना आदेश असतानाही सही करून शालार्थ आयडी या प्रस्तावावर वेतन अधिक्षक (प्राथमिक) सोलापूर यांचेकडे पाठवत नाहीत. त्यामुळे वेतनापासून वंचित आहे. सदरचा प्रस्ताव मुख्याध्यापक सहीविना वेतन अधिक्षक (प्राथमिक) यांचेकडे सादर केलेला आहे. गेली सहा महिन्यांपासून शालार्थ आयडीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. सदरचा शालार्थ आयडीचा प्रलंबित प्रस्ताव तात्काळ शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांचेकडे पाठविला नसल्याने मुख्याध्यापक व प्रशासन विरोधात मंगळवार दिनांक १७/०५/२०२२ पासून संविधानिक मार्गाने आमरण उपोषणास बसणार असल्याचे अनिता राठोड यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

error: Content is protected !!