ब्रेकिंग न्युज
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताहपारगाव सिरस येथे बैलगाडी शर्यतीमध्ये आली रंगत ..!वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान १००० कलशधारी सुवासिनी महिलांची प्रभात फेरी ठरणार लक्षवेधीजिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात…युवकांनी सलोखा , बंधुत्व संबंध जोपासण्याची गरज –  ॲड. सुभाष (भाऊ) राऊत

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील महिलांना 24 वर्षानंतर ही वारस पेन्शन मिळणार उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांची घोषणा भाजप विधानपरिषद आमदार उमाताई खापरे यांच्या प्रयत्नांना यश.

नागपूर प्रतिनिधी

शासकीय सेवेत असताना किंवा निमशासकीय सेवेत असताना अथवा सेवा निवृत्त वेतनाचा लाभ घेत असलेल्या आई वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात अविवाहित किंवा घटस्फोटित किंवा दिव्यांग मानसिक दृष्टा सक्षम नसणाऱ्या मुलींना त्यांच्या आईवडिलांची पेन्शन मिळत नसणाऱ्या कुटुंबाची आर्थिक हाल होत असल्याने अशा कुटुंबाना केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे राज्य सरकारकडून पेन्शन योजना सुरू करावी. अशी माघणी या धर्तीवर भाजप विधानपरिषद आमदार उमाताई खापरे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. यावर उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यात सुद्धा अशा प्रकारच्या योजना सुरू करण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले.

महिलांबद्दल अत्यंत संवेदनशील असणारे नेतृत्व म्हणून परिचित असणाऱ्या भाजप विधानपरिषद आमदार उमाताई खापरे यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. भाजप महिला मोर्चा माध्यमातून राज्यभर महिलांचे संघटन उभा करून एक अत्यंत यशस्वी महिला नेत्या म्हणून उमाताई खापरे ओळखल्या जातात. संपूर्ण राज्यभर चांदा ते बांदा पर्यंत खडतर प्रवास करून महिलांचे एक यशस्वी संघटन तयार करण्यात उमाताई यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. या कामाची पोचपावती म्हणून त्यांना थेट आमदारकीचे बक्षीस मिळाले. त्याच माध्यमातून महिलांना जास्तीत जास्त न्याय देण्यासाठी उमाताई खापरे प्रयत्नशील आहेत.

error: Content is protected !!