ब्रेकिंग न्युज
लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळे

महाराष्ट्रात प्रचंड व्यक्तीद्वेषाचे राजकारण; त्यामुळेच स्वराज्य संघटनेची स्थापना

 

संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा स्वराज्य स्थापनबद्दलची माहिती दिली आहे. राज्यात सुरु असलेल्या सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपवेर सुद्धा त्यांनी यावर सडकून टीका केली आहे. आज महाराष्ट्रासमोर अनेक अडचणींचा डोंगर उभा असताना व्यक्तीद्वेष समोर ठेवून सत्ताधारी आणि विरोधक राजकारण करत आहेत, हे महाराष्ट्राचे फार मोठे दुर्दैव आहे. म्हणूनच महाराष्ट्राला नवी दिशा देण्यासाठी आम्ही स्वराज्य या संघटनेची स्थापना केली आहे, असं मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलं. सांगली येथे प्रसार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी आपले मत मांडले.

सांगलीमध्ये सकल मराठा समाजाकडून तरुण भारत स्टेडियमवर भरवण्यात आलेल्या मराठा प्रीमिअर लीग 2023 च्या क्रिकेट सामन्यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना संभाजीराजेंनी अनेक मुद्द्यावर परखडपणे मत व्यक्त केली. यावेळी मराठा प्रीमिअर लीगमध्ये सहभागी झालेल्या टीममधील खेळाडूंशी भेट घेत संभाजीराजे छत्रपती यांनी सर्व टीमना शुभेच्छा दिल्या.

‘फडतूस’ या शब्दावरुन महाराष्ट्रामध्ये सुरु असलेल्या उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरु झाले आहे. महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा घसरलेल्या दर्जावरुन संभाजीराजे छत्रपती यांनी सर्व राजकारण्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. व्यक्तीद्वेष ठेवून कुणीही राजकारण करु नये. व्यक्तीद्वेष ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. खरंतर विकासाचे ध्येय समोर ठेवून राजकारण केलं पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावर बोललं तरच सुसंस्कृत महाराष्ट्र घडेल. सत्तेवर असलेल्यांनी किंवा नसलेल्यांनी देखील व्यक्तीद्वेष सोडून विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे. लोकांना काहीतरी आवडते म्हणून काहीही बोलणं हे टाळलं पाहिजे.

error: Content is protected !!