ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

ठाण्यातूनही निवडणूक जिंकणार म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर,

 

ठाण्यातील युवासेनेच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर महाविकास आघाडीने जनक्षोभ यात्रा काढत सरकारवर निशाणा साधला. आदित्य ठाकरे यांनी या सभेत एकनाथ शिंदे यांना आपण ठाण्यातून निवडणूक लढत जिंकून दाखवू असं जाहीर आव्हान दिलं. दरम्यान आदित्य ठाकरे तसंच उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.

शिंदे म्हणाले की, “शिवसेना मोठी करण्यासाठी माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं. तुमचा तेव्हा जन्मही झाला नव्हता. घरावर तुळशीपत्र ठेवलं होतं, म्हणूनच शिवसेना इतकी मोठी झाली. त्यामुळे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या आणि आयत्या पीठावर रेघोटे ओढणाऱ्यांबद्दल मी काय बोलणार? मला त्यांच्यावर बोलण्याची गरज वाटत नाही,” असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.

“ठाण्यात फार अस्वस्थता दिसत असल्याचं मी कालही पाहिलं. त्यांनी सर्व मर्यादा सोडल्या आहेत. सत्ता गेल्यावर काय परिस्थिती होते हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. मला गुंडमंत्री आणि फडणवीसांनी फडतूस गृहमंत्री म्हणाले. ज्यांच्या काळात इतके मोठे कांड झाले, दोन मंत्री जेलमध्ये गेले, गृहखात्याचे धिंडवडे काढले, विरोधात बोलणाऱ्यांना जेलात टाकलं, नारायण राणेंना जेवणावरुन उठवलं, कंगनाचं घर तोडलं, केतकी चितळेला जेलमध्ये टाकलं, नवनीत राणा आणि रवी राणा यांना जेलात टाकलं. ही केलेली गुंडागर्दी ते विसरले का? तेव्हा ते मुख्यमंत्री होते. आम्ही असं काही केलं नाही,” असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं.

error: Content is protected !!