ब्रेकिंग न्युज
अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणार

मंडणगड शहरात पाणी पुरवठा न केल्यास 23 जून रोजी हंडामोर्चा विरोधी गटांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

 

मंडणगड : प्रतिनिधी  एप्रिल महिन्यात सुरु झालेली मंडणगड शहराची पाणी टंचाईची समस्या जुन महिन्यातही कायम आहे. या प्रश्नावर शहरातील नागरीकांमध्ये प्रशासन व सत्ताधाऱ्यांचे विरोधात असलेल्या असंतोषाला आज विरोधी नगरसेकांनी वाचा फोडली. नगरपंचात विरोधी गटाचे नेते नगरसेवक विनोद जाधव, नगरसेवक आदेश मर्चंडे, मुश्ताक दाभिळकर, निलेश सापटे, प्रविण जाधव, सेजल गोवळे, वैशाली रेगे, प्रमिला किंजळे यांनी मुख्याधिकारी विनोद दवले यांच्याकरिता नगरपंचायतीचे पाणी पुरवठा अधिकारी विकास साळवी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन सादर केले. या निवेदनातील माहीतीनुसार नगरपंचायत क्षेत्रातील सर्वच ठिकाणी पाणी टंचाईचे संकट असून पाणी टंचाईची समस्या दुर करण्यासाठी नगरपंचायतीचे मासीक सभेत ठराव करुन शहरातील सर्व भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे ठरले होते. त्याकरिता निविदा काढण्यात आली परंतू आजअखेर या ठरावाची अंमलबजावणी न झाल्याने शहरवासीयांना भीषण पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. तरी गुरुवार 22 जून 2023 रोजी सायंकाळी उशीरा पर्यंत शहरातील सर्व भागांना पाणी पुरवठा न झाल्यास मंडणगड शहर विकास आघाडीच्यावतीने शुक्रवार 23 जून 2023 रोजी समस्येचे निराकरण व्हावे या उद्दशाने हंडा मोर्चा काढून तीव्र स्वरुपांचे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. शहराचे पाणी टंचाईमुळे निर्माण झालेल्या विविध समस्या यामुळे नागरीकांचे होत असलेले हाल विषयावर विरोधी नगरसेवकांनी माध्यमांशी विस्तृत चर्चाही केली. गटनेते विनोद जाधव यावेळी म्हणाले की, सत्ताधाऱ्यांची कारभारात प्रचंड उदासीनता आहे. शहराची पाणी टंचाईची समस्या वर्षानुवर्षे गंभीर झालेली असताना समस्या दुर करण्यासाठी संभाव्य कृती आरखडा डिसेंबर महिन्यात करणे आपेक्षीत होते. पण नियोजन करण्यास सत्ताधारी नेहमीच अपय़शी ठरले. सत्ताधाऱी सर्वसामवेश कारभार व सत्ता राबवण्यात अपयशी ठरले आहेत व जून महिन्यात शहरास भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्येमुळे ते स्पष्ट झाले आहे. जीवनावश्यक असलेल्या पाणी या महत्वपुर्ण विषया संदर्भात गांभीर्य नसलेले सत्ताधारी काय कामाचे असा प्रश्न उपस्थित करताना समस्या मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला. शहरात कचरा प्रश्न स्वच्छता गृहांचा अभाव अशा विविध समस्या भेडसावत असताना गांभीर्य नसलेले सत्ताधारी ढिम्मपणे बसलेले असल्याच आरोप केला. सत्ताधारी पाणी पुरवठा करण्यास अपय़शी ठरले तर आंदोलन करुन विषयाची तीव्रता लक्षात घेऊन शहरवासीयांना शहर विकास आघाडीच्यावतीने पाणी पुरवठा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.

error: Content is protected !!