ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

आम आदमी पार्टी जामखेड तालुका यांच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

आम आदमी पार्टी जामखेड तालुका यांच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

जामखेड प्रतिनिधी;-भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त आम आदमी पार्टी जामखेड तालुका यांचे वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले ,ज्येष्ठ नागरिक शिवदास आव्हाड सर,भागवत हजारे साहेब यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले .

छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, महात्मा फुलेंचा विजय असो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी विजय असो. अशा घोषणा देऊन सर्व महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी भारताचे संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
यावेळी आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष नवलाखा,संघटन मंत्री बजरंग सरडे, शहराध्यक्ष अजय भोसले, सहकार आघाडी संजय सदाफुले, सुंदर परदेशी, समीर मणियार,वाहन संघटनेचे मच्छिंद्र वायफळकर, सोमनाथ रोडे, शहाजी जरे, विनोद अवसरे,रियाज खान, बाळू शिखरे, सचिन शिंदे,बाळू तांबे,शिवराज डोके, ज्ञानेश्वर क्षिरसागर,संपत सर्वे, बबलू देशमुख, सचिन नवलाखा, सुशिल सदाफुले, काकासाहेब रायकर आदि कार्यकर्ते ,नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!