ब्रेकिंग न्युज
घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनआरटीईचा घोळ संपला, उद्यापासून भरता येणार ऑनलाइन अर्ज, हा केला महत्वाचा बदलमहाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी 

आदित्य शिक्षण संस्थेच्या प्रा. प्राची उदापुरकर यांना फार्मसी क्षेत्रातील पी.एचडी. संशोधनासाठी पेटंट प्रदान

आदित्य शिक्षण संस्थेच्या प्रा. प्राची उदापुरकर यांना फार्मसी क्षेत्रातील पी.एचडी. संशोधनासाठी पेटंट प्रदान
बीड । प्रतिनिधी;-शहरातील नावाजलेल्या आदित्य शिक्षण संस्थेतील प्रा.डॉ. प्राची उदापूरकर यांना भारतीय पेटंट कार्यालयाने पुनर्नवा या औषधी वनस्पतीवरील लिपीड संयुगा संबंधी अविष्कारास पेटंट प्रदान केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत सी.बी.कॉलेज ऑफ फार्मसी, लातूर संशोधन केंद्राच्या आचार्य पदवी मिळवणाऱ्या डॉ. प्राची उदापूरकर ह्या प्रथम संशोधक आहेत. त्यांना या संशोधनाकरिता पी.एचडी. मार्गदर्शक डॉ ओमप्रकाश भुसनुरे व आदित्य फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष जैन यांनी सहकार्य केले.
भारत सरकारच्या उद्योग संवर्धन आणि आंतरिक व्यापार विभागाअंतर्गत चालणाऱ्या भारतीय पेटंट कार्यालयामार्फत नाविन्यपूर्ण, सहज नसलेल्या व औद्योगिक उपयुक्तता असणाऱ्या संशोधनासाठी बौद्धिक संपदा जपण्या करिता पेटंट प्रधान केले जाते. नव-नवीन संशोधन करून देशाच्या औद्योगिक व आर्थिक प्रगतीमध्ये भर घालण्याकरिता आदित्य शिक्षण संस्थेतील विविध विभागात प्राध्यापक व विद्यार्थ्यांना उपयुक्त पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. डॉ. प्राची उदापुरकर यांना राष्ट्रीय स्तरावरील पेटंट मिळाल्याबद्दल आदित्य शिक्षण संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा यांच्यासह संचालक डॉ. आदित्य सारडा, डॉ. आदिती सारडा यांच्यासह आदित्य शिक्षण संस्थेतील सर्व प्राचार्य, प्रा. कर्मचारी यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
error: Content is protected !!