ब्रेकिंग न्युज
घराला आग लागून संसारोपयोगी साहित्यासह कापूस जळून खाकबीड जिल्हा जातीपातीच्या नव्हे तर कर्तृत्वाच्या मागे उभा राहतो-ना.धनजंय मुंडेशेवगाव तालुक्यातील अपहृत मुलींची सुटका! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; अज्ञात महिलेच्या ‘फोन’ने लावला छडा..ओबीसी नेत्याला बॅनरवर डावलल्याने भुजबळ समर्थक ओबीसी मतदार पंकजाताई मुंढे यांना मतदानातून धडा शिकवणार – बापू गाडेकर तपनेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न जि प नान्नज मुले शाळेचे आठवडे बाजारात पथनाट्यातून मतदानासाठी जनजागृती अभियानवंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ ऍड. प्रकाश आंबेडकर यांची   दिनांक 3 मे रोजी आंबेजोगाई मार्केट ग्राउंड वर होणार जाहीर सभा : लाखोच्या संख्येने उपस्थित रहा :- अशोक हिंगे पाटीलवनविभागातील आधिका-यांचा कारभार म्हणजे कुंपनच शेत खातंय; जिल्हाधिका-यांना तक्रार:- डॉ.गणेश ढवळेआंबेडकरी चळवळ तळागाळात पोहचविण्याचे काम युवकांनी करावे : पप्पू कागदेआ.संदीप क्षीरसागरांचा बजरंग सोनवणेंसोबत झंझावाती दौरा

डॉ.बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी जयंती साजरी केली पाहिजे – सहायक पोलिस निरीक्षक गौतम तायडे

डॉ.बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी जयंती साजरी केली पाहिजे – सहायक पोलिस निरीक्षक गौतम तायडे

ग्रामीण विकास केंद्रच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

जामखेड प्रतिनिधी;-डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एका समूहाची किंवा जातीचे नसून जे लोक लोकशाही मानतात तसेच समतावादी विचारसरणीचे आहे.त्या सर्वांची आहे. संत, महामानवांच्या समाजसुधारणेचा भारत पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतात अशा सर्व जाती समूहाच्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी त्यांची जयंती साजरी केली पाहिजे असा विश्वास सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम तायडे यांनी व्यक्त केला.

जामखेड शहरातील कुंभार तळे येथील ग्रामीण विकास केंद्राच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १३३ व्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.

पुढे बोलताना तायडे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान याचे साक्ष आहे. देशातील गरीब ,श्रीमंत, उपेक्षित, शोषित समाजाची प्रगती आज झालेली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे शोषित समाज जिवंत राहिला आहे. कारण ज्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता जगण्याचा अधिकार नव्हता हे सर्व अधिकार कायद्याच्या चौकटीत राहून भारतीय संविधानाने आपल्याला दिलेले आहेत.

यावेळी एडवोकेट डॉ. अरुण जाधव म्हणाले की,परंतु या देशांमध्ये काही महापुरुष जन्माला आले त्यांच्या विचारातून प्रबोधनातून, कामातून क्रांती केली आहे . सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी सर्वश्रेष्ठ राष्ट्रपिता महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज साता समुद्रापलीकडे साजरी होत आहे. म्हणजे महापुरुषांच्या विचाराला उजाळा देणे.

यावेळी प्रवक्ते बापूसाहेब ओव्होळ, सामाजिक कार्यकर्ते विकी भाऊ सदाफुले ,बापूसाहेब गायकवाड यांनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी सहायक पोलीस निरीक्षक गौतम तायडे,एडव्होकेट डॉ अरूण जाधव, प्रवक्ते बापूसाहेब ओव्होळ,बौध्दाचार्य बलभीम जावळे,आतिष पारवे, नगरसेवक मोहन पवार,सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, सुरेश जाधव, बापूसाहेब गायकवाड, प्रताप पवार,राजन समिंदर, विनोद सोनवणे, संदीप तुपेरे , पांडुरंग समुद्र, नंदकुमार गाडे,अजिनाथ शिंदे, संतोष चव्हाण, जितेंद्र आढाव,रवि सोनवणे, सचिन सदाफुले,जाॅकी सदाफुले,अनिल जगदाळे,सुरवसे गुरुजी, द्वारका पवार’, रेश्मा बागवान, ऋषिकेश गायकवाड, मुस्तफा मदारी, बाबासाहेब काळे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!