ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

*बजरंग सोनवणेंच्या प्रचारार्थ नेकनूर परिसरात माजी आ. पृथ्वीराज साठेंच्या गाठीभेटी* —————————-

बीड / नेकनूर :- बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ माजी आ. पृथ्वीराज साठे यांनी नेकनूर परिसरातील गावांना भेटी देत मतदारांशी संवाद साधला.

माजी आमदार पृथ्वीराज साठे हे बजरंग सोनवणे यांना निवडून आणण्यासाठी सरसावले आहेत. त्यांनी अंबाजोगाई शहर व परिसरातील गावे पिंजून काढले. सोमवारी नेकनूर व परिसरातील आनंदवाडी, मांडवखेल, कळसंबर, भंडारवाडी, जैताळवाडी या गावांमध्ये भेटी देत बैठका घेऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विधानसभा प्रमुख सुरेश पाटील, शंकर जाधव, नवनाथ देवगुडे, अनिल जाधव, हनुमंत घाडगे, शिवाजी चौधरी, विनोद चाटे, संजय शिंदे, महिला आघाडीच्या संजीवनी देशमुख, तस्लिम इनामदार, कैलास चाळक, विठ्ठल वैरागे, युवराज मगर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, मराठा व ओबीसी आरक्षण व एनआरसी याच्या पार्श्वभूमीवर मतदारांचा मोठा वाढता पाठिंबा मिळत असून अबकी बार भाजप हद्दपार करणारच. असा चंग माजी आ पृथ्वीराज साठे यांनी बांधला आहे.

error: Content is protected !!