ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

*माजलगाव शहरातून बजरंग सोनवणेंची दुचाकी रॅली, घोषणांनी शहर दणाणले.* 

 

बीड / माजलगाव

 

बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांची सोमवारी सकाळी कार्यकर्त्यांनी शहरातून ढोल ताशांच्या गजरात दुचाकी रॅली काढली. यावेळी बजरंग सोनवणे यांनी बुलेटवर स्वार होऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी बजरंग बली की जय असा जयघोष करीत शहर दणाणून सोडले.

 

बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांची सोमवारी सकाळी माजलगाव तालुका दौऱ्यावर आले होते. यावेळी सोनवणे यांनी शहरातील अनेक ठिकाणी भेटी देत मतदारांशी संवाद साधून लोकसभेच्या निवडणुकीत निवडून द्यावे असे आवाहन केले.

 

त्यानंतर कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तर रॅलीत उमेदवार बजरंग सोनवणे हे स्वतः बुलेटवर स्वार झाले होते. शहरातून रॅली काढत असताना रस्त्यावरील महापुरूषांच्या नावांच्या चौकाला त्यांनी पुष्पहार अर्पण केले. तर वाटेत अनेकांनी त्यांचे हार घालून स्वागत केले. रॅलीत सहभागी झालेल्या असंख्य कार्यकर्त्यांनी बजरंग सोनवणे की जय व बजरंग बली की जय अशा घोषणा देत शहर दणाणून सोडले.

 

यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते मुत्सद्दीकबाबा, काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष

नारायण होके, शिवसेनेचे उबाठा गटाचे तालुका प्रमुख पप्पु धरपडे, राजेश घोडे, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष नारायण डक, शेतकरी कामगार पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड. नारायण गोले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष

मनोहर डाके, दयानंद स्वामी, कचरू खळगे, मनोज फरके

यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आप शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना ठाकरे गट व मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!