ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

सिंदफणा शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

सिंदफणा शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी
माजलगाव प्रतिनिधी;-येथील विद्याभुवन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंदफणा पब्लिक स्कूल येथे संस्थेच्या सचिव मंगलाताई सोळंके व समन्वयक नीला देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीसुर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते दयानंद साळवे हे उपस्थित होते.  आपल्या भाषणात त्यांनी महात्मा फुले आणि बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटनांचे कथन केले. शाळेचे प्राचार्य अन्वर शेख आपल्या भाषणात म्हणाले की, जेव्हा मी वंचित बहुजन समाज, महिला व कामगार वर्गाचा झालेला विकास पाहतो तेव्हा मला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आवर्जून आठवण येते. सर्व विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या व महात्मा फुलेंच्या कार्यातून नेहमी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.  यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थिनींनी वामनदादा कर्डक लिखित ‘ माऊलीची माया होता, माझा भीमराया’ हे गीत सादर केले तर ‘ तूच आमची प्रेरणा ‘ हे नाटक सादर करण्यात आले. तसेच प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी ‘ नांदन नांदन’ या गीतावर नृत्य सादर केले आसित मगर या विद्यार्थ्याने ‘ मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलतोय ‘ हा एकपात्री प्रयोग सादर केला.
माध्यमिक विभागातील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृत शिक्षक ज्ञानेश्वर कुंडकर यांनी केले तर आभार सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक जीजाराम गडाख यांनी व्यक्त केले. प्राथमिक विभागातील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक विभाग प्रमुख अर्चना जाधव यांनी केले तर आभार पांडुरंग तोडकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे संचालक सखाराम जोशी व त्यांचे सहकारी, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच शालेय परिपाठ विभागाने परिश्रम घेतले.
error: Content is protected !!