ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

*बजरंग सोनवणेंनी रुग्णालयात जाऊन अमोल खुणेंची भेट घेतली* *हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी* ————————,—————

 

बीड / गेवराई

 

मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी अमोल खुणे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी गेवराईच्या रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. हल्लेखोरांना ‘ तात्काळ अटक करण्याची मागणी ही सोनवणे यांनी केली आहे.

 

मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी व कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना न्यायालयाच्या आवारात चोप देणारे अमोल खुणे यांच्यावर सोमवारी (दि.१५) रात्री ७.३० वाजेच्या सुमारास अज्ञात तीन ते चार इसमांनी दगडफेक करीत भ्याड हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. त्यांच्यावर गेवराईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी महाविकास उमेदवार बजरंग सोनवणे यांनी अमोल खुणे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. तर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी भेटून उपचार व त्यांच्या प्रकृती विषयी माहिती जाणून घेतली. या हल्ल्याचा निषेध करीत या प्रकरणाची चौकशी करून हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी ही बजरंग सोनवणे यांनी केली आहे.

यावेळी त्यांच्या सोबत पूजा मोरे, बालासाहेब जाधव, मुकुंद कणसे, कपिल मस्के, नवनाथ अंबाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!