ब्रेकिंग न्युज
मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !स्वाराती रूग्णालयातील मशिन व यंत्रसामुग्री दुरूस्त करून रूग्णांचे हाल थांबवाकार,मोटारसायकल व बैलगाडीच्या तिहेरी अपघातात एक ठार चार जखमीअलंकापुरीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात  अपयशाने खचून न जाता यशाला जिद्द परिश्रमाच्या जोरावर जीवन प्रकाश’माननर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्न

कास्ट्राईब महासंघाचा सामाजिक भान जपणारा कार्यक्रम म्हणून भीमजन्मोत्सवाची नोंद होईल-मा.आ.अमरसिंह पंडित

कास्ट्राईब महासंघाचा सामाजिक भान जपणारा कार्यक्रम म्हणून भीमजन्मोत्सवाची नोंद होईल-मा.आ.अमरसिंह पंडित

शानदार सोहळ्यात समाजरत्न व प्रेरणास्तंभ पुरस्कार वितरण

गेवराई दि. १६ (प्रतिनिधी)- जगात ‘सिम्बाॅल ऑफ नाॅलेज’ म्हणून ख्यातीप्राप्त असलेल्या विश्वरत्न बोधिसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त कास्ट्राईब महासंघाने समाजात आणि शासकीय सेवेत उत्तम काम करत आपले सामाजिक दायित्व पार पाडणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, कर्मचारी व शिक्षक यांना विविध पुरस्कार देवुन सामाजिक भान जपले,याचा मला विशेष आनंद आहे आणि या कार्यक्रमाची नोंद सामाजिक स्तरावरही घेतली जाईल ,अशी मला खात्री आहे. असे माजी आ.अमरसिंह पंडित यांनी प्रतिपादन केले. कास्ट्राईब महासंघातर्फे आयोजित भीमजन्मोत्सव सोहळ्यात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी नवनाथ सोनवणे, जेष्ठ शि.वि.अ.धनंजय शिंदे, ॲड. सुभाष निकम, कास्ट्राईबचे केंद्रीय महासचिव बापूसाहेब ससाणे, प्रा.शि.संघाचे नेते तात्यासाहेब मेघारे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.नोमानी, आयोजन समितीचे अध्यक्ष प्रल्हाद शिंदे आदी उपस्थित होते. कास्ट्राईब महासंघातर्फे दरवर्षी गेवराई पंचायत समितीच्या प्रांगणात भीमजन्मोत्सव साजरा करण्यात येतो. यंदाचे हे आठवे वर्ष होते. या भीमजन्मोत्सव सोहळ्याचे एक वैशिष्ट्य असे की, दरवर्षी गेवराई तालुक्यातील शिक्षक, कर्मचारी ,अधिकारी यांना प्रेरणास्तंभ व समाजरत्न पुरस्कार देवुन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येतो. यंदा अशा 24 गुणवंतांचा सन्मान यानिमित्ताने करण्यात आला.
दिप प्रज्वलन व बाबासाहेबांच्या प्रतिमा पूजनाने सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक त्वरिता अर्बन बँकेचे संस्थापक तथा कास्ट्राईबचे मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष विजय डोंगरे यांनी करुन महासंघाच्या या भीमजन्मोत्सव सोहळ्याची रुपरेषा आणि कास्ट्राईब महासंघाची वाटचाल मांडली. त्यानंतर समाजरत्न पुरस्कारप्राप्त प्रभाकर पिसाळ, ॲड.भगवान कांडेकर, उत्तम हजारे, प्रा. राजेंद्र बरकसे, ॲड. बाबासाहेब घोक्षे आदींचा समाजरत्न म्हणून माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या हस्ते सपत्नीक गौरव करण्यात आला. प्रेरणास्तंभ पुरस्कार प्राप्त अधिकारी म्हणून डाॅ.नोमानी,श्रीमती उमा ‘कांडेकर,राघव वाव्हळे, सांगळे,अरुण जायभाये, श्रीमती पाठक, पवार, श्रीम. सानप, सौदागर कांबळे, क्षीरसागर, आदिंसह 20 जणांचा अमरसिंह पंडित, नवनाथ सोनवणे व इतर मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला.
याप्रसंगी समाजरत्न व प्रेरणास्तंभ म्हणून गौरविलेले राघव वाव्हळे, श्रीमती कांडेकर आणि भगवान कांडेकर यांची आभारदर्शक भाषणे झाली. आपल्या तडाखेबंद शैलीत भगवान कांडेकर यांनी बाबासाहेबांच्या जीवनचरित्रातील ठळक घडामोडी मांडल्या. प्रमुख अतिथींपैकी कास्ट्राईबचे राज्य महासचिव बापूसाहेब ससाणे यांनी महासंघाच्या कार्याचा लेखाजोखा मांडत आपण महासंघात सक्रिय झाल्यापासून काय बदल केले आणि किती व्यापकता आणुन महासंघ कसा सर्वसमावेशक केला याची मांडणी करून सर्व पुरस्कारर्थ्यांचे अभिनंदन केले. गटशिक्षणाधिकारी सोनवणे यांनी मी तालुक्यातील शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असुन हसतमुखाने आपण आपली कर्तव्यनिष्ठा जपावी ,असा मोलाचा संदेश दिला.
आयोजन समितीचे अध्यक्ष प्रल्हाद शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.
या संपुर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन करुन उपस्थितांना खिळवून ठेवणारे tकास्ट्राईब चे तालुका सचिव विश्वभुषण सोनवणे यांनी खऱ्या अर्थाने सभा जिंकली.
कास्ट्राईब महासंघाच्या वतीने उपस्थित सर्वांसाठी अल्पोपाहार ठेवला होता.त्याचा उपस्थितांनी आस्वाद घेतला. तर संपूर्ण कार्यक्रमात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जुनी पेन्शन हक्क संघटनेचे विष्णु आडे आणि जितेंद्र दहिफळे यांनी केली होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष अमोल आतकरे, पी.बी.शिंदे, सुुनिल सुतार, दयानंद कांडेकर, संतोष भाले, विजय डोंगरे, अमोल मनकटवाड, महेश वायभसे, राम जोशी, मंगेश कुलकर्णी, आकाश जाधव, रोहन कांडेकर, विश्वभुषण सोनवणे, नितीन कांडेकर यांच्यासह अनेकांनी प्रचंड मेहनत घेतली.कार्यक्रमास तालुक्याच्या विविध भागातुन मोठ्या संख्येने शिक्षक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली.

error: Content is protected !!