ब्रेकिंग न्युज
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताहपारगाव सिरस येथे बैलगाडी शर्यतीमध्ये आली रंगत ..!वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान १००० कलशधारी सुवासिनी महिलांची प्रभात फेरी ठरणार लक्षवेधीजिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात…युवकांनी सलोखा , बंधुत्व संबंध जोपासण्याची गरज –  ॲड. सुभाष (भाऊ) राऊत

निपाणी जवळका येथे दोन दिवस भव्य ज्योतिबा यात्रा उत्सव

निपाणी जवळका येथे दोन दिवस भव्य ज्योतिबा यात्रा उत्सव
ट्रस्टचे विश्वस्त अण्णासाहेब लोणकर यांची माहिती
गेवराई ;- श्रीक्षेत्र ज्योतिबा देवस्थान निपाणी जवळका येथील यात्रा दि.23 व दि.24 वार मंगळवार व बुधवार या दोन दिवसात भव्य दिव्य अशी यात्रा भरणार आहे, अशी माहिती श्रीक्षेत्र ज्योतिबा संस्थान ट्रस्टचे विश्वस्त श्री अण्णासाहेब लोणकर यांनी दिली.
दरम्यान गेल्या वर्षीच्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या देणगीमुळे मंदिराचे व परिसरातील भव्य दिव्य असे बांधकाम पूर्ण झालेले आहे. दरवर्षीप्रमाणे रितीरिवाजानुसार गंगेवरून पाणी आणून पहाटे पहाटेच देवतेस शाही स्नान, पहिल्या दिवशी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम, भव्य दिव्य छबीना मिरवणूक,. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील नामांकित कुस्तीपटूंचा कुस्तीचा फड असे सर्व कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. तसेच श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर जीर्णोद्धाराचा मोठा व्यापक कार्यक्रम हाती घेतलेला आहे. यासाठी गावातील सर्व तरुण मंडळ यांनी बैठक घेतली व यात्रेच्या ठिकाणी उन्हामधून आलेल्या यात्रेकरूसाठी मागील वर्षी एक हजार जार च्या पाण्या चे नियोजन केले होते या वर्षी ऊन खुप पडायला लागले आहे त्यामुळे मागील वर्षी प्रमाणे या वर्षी जास्त पाण्या चे नियोजन केले आहे पिण्याचे स्वच्छ पाण्या चे नियोजन केले आहे . मंदिर परिसरामध्ये उपलब्ध केलेले आहे. सावलीसाठी मंडप उभारणी, दर्शन रांगा, आलेल्या सर्व दुकानदारांचे योग्य नियोजन व ज्योतिबांच्या गाड्या ओढण्याच्या कार्यक्रम स्थळीचा परिसर स्वच्छ करणे, कुस्तीच्या फडांचा चोख बंदोबस्त या सर्व विषयावर चर्चा झाली व त्याचे नियोजन करण्यात आले. दरम्यान गेल्या वर्षी प्रमाणेच याही वर्षी होणारी अलोट गर्दी पाहता योग्य ते नियोजन सर्व गावकऱ्यांनी केलेले आहे. याप्रसंगी रामेश्वर काकडे, दिगंबर लोणकर, मधुकर काकडे, कचरू काकडे, अंगद काकडे, इंजि. अमोल लोणकर, अमोल प्रभाळे, श्रीकिसन लोणकर, अमोल काकडे, बंडू काकडे, रामप्रभू भापकर, सचिन धुमाळ, प्रमोद धुमाळ, बाळू ढेरे, विशाल लोणकर, किशोर लोणकर, बाळू लोणकर, योगेश काकडे, अंगद काकडे, अशोक काकडे, सचिन वाळकर, संजय काकडे, नितीन लोणकर, किरण लोणकर, सुभाष काकडे, राजाभाऊ गायके, हेमंत लोणकर, भाऊसाहेब काकडे, अशोक लोणकर, विनोद आतकरे, नवनाथ काकडे, रविराज काकडे यांच्यासह गावातील सर्व मंडळी उपस्थित होते.
error: Content is protected !!