ब्रेकिंग न्युज
कामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजराआयुष्यमान भारत योजनेचा लाभ पांढऱ्या व केशरी कार्ड धारकांना पण – डॉ ओमप्रकाश शेटेजामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागर

निजामकालीन खजाना विहिरीला  दुष्काळाच्या झळा ; पाण्याने तळ गाठला ; संरक्षण व संवर्धनाची गरज :- डॉ.गणेश ढवळे

निजामकालीन खजाना विहिरीला  दुष्काळाच्या झळा ; पाण्याने तळ गाठला ; संरक्षण व संवर्धनाची गरज :- डॉ.गणेश ढवळे
बीड:- कमी पावसामुळे घटत जाणा-या भुजल पातळीचा परीणाम विहिरी,धरणे,साठवण तलावा बरोबरच प्राचीन काळातील जलतंत्रज्ञानावर झाला असुन बीड जिल्ह्याला मागील ४-५ वर्षांपासून सतत कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळाच्या झळा बसत असतानाच बीड
शहराचे वैभव असणा-या खजाना विहिरीला दुष्काळाची झळ बसली असुन पाण्याची पातळी कमी होऊन तळ गाठला आहे. विहिरीच्या संरक्षण आणि संवर्धनाची आवश्यकता असुन गाळ काढुन विहीरीच्या सिंचन क्षमतेत वाढ होऊन विहीरीच्या सौंदर्यात भर पडणार असल्याने प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.
सविस्तर माहितीस्तव
बीड शहराच्या दक्षिणेस ५ किलोमीटर अंतरावर १५७२ च्या सुमारास निजामकालीन शास्त्रीय दृष्टिकोनातून स्थापत्य कलेचा जलस्त्रोतापैकी अतिशय उत्तम नमुना असलेली विहीर बांधण्यात आली.विहिरीचा व्यास सुमारे ५० फुट असुन खोली २३.५ मीटर आहे.जमिनीपासुन १७ फुट अंतरावर असलेल्या विहिरीला गोलाकार ओरंडा असुन ओसरी खाली ६ फुट विहीर आहे.बीड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी विहीरीमध्ये कालवा बांधलेला आहे.या कालव्याद्वारे बीड शहरातील बलगुजर भागातील ४५० एकर शेती कुठल्याही उपकरणाशिवाय सिंचनाखाली आहे.विहिरीला ३ कालवे आहेत.यातील एक नैऋत्य,दुसरा अग्नेय तर तिसरा उत्तर दिशेला.कधीही न आटणा-या खजाना विहीरीच्या बांधकामासाठी चुना आणि दगडांचा वापर केलेला असुन मध्ययुगीन काळात या परिसरातील गोळा होणारा पैसा राजाला न देता विहिरीच्या बांधकामासाठी खर्च केल्याने या विहिरीला खजाना विहीर असे नाव पडले आहे.
विहिरीच्या संरक्षण व संवर्धनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ; गाळ काढण्याची आवश्यकता:- डॉ.गणेश ढवळे
बीड शहराच्या वैभवात भर घालणारी बीड शहरालगत असणा-या खजाना विहीरीच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करणं गरजेचं असताना संवर्धनाची जबाबदारी असणाऱ्या पाटबंधारे विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असुन या विहिरीतील गाळ काढणे आवश्यक आहे.विविध सामाजिक संघटना, इतिहास प्रेमी यांच्याकडून अधुनमधून विहिरीची स्वच्छता करण्यात येते मात्र पाटबंधारे विभागाने यातील गाळ काढणे आवश्यक आहे त्यातुन विहिरीच्या सिंचन क्षमतेत वाढ होऊन विहिरीच्या सौंदर्यात भर पडणार आहे.त्यामुळे विहिरींचे संरक्षण आणि संवर्धन होणे गरजेचे आहे.
error: Content is protected !!