ब्रेकिंग न्युज
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताहपारगाव सिरस येथे बैलगाडी शर्यतीमध्ये आली रंगत ..!वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान १००० कलशधारी सुवासिनी महिलांची प्रभात फेरी ठरणार लक्षवेधीजिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात…युवकांनी सलोखा , बंधुत्व संबंध जोपासण्याची गरज –  ॲड. सुभाष (भाऊ) राऊत

*कोयता दाखवून नेता होणाऱ्यानी ऊसतोड मजुरांचे दुःख कमी करण्यासाठी काय केले ?* *बजरंग सोनवणेंचा पंकजा मुंडेंवर हल्लाबोल.*

 

 

 

बीड / गेवराई

 

कोयता दाखवून नेता होणाऱ्यानी ऊसतोड कामगारांच्या व्यथा, कष्ट, अडीअडचणी व दुःख कमी करण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले ? त्यांना ऊस तोडणी करून मोळ्या वाहता येतील का ? अशा खरमरीत शब्दात इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी ऊसतोड कामगारांच्या नेत्या म्हणणाऱ्या पंकजाताईचे नाव न घेता हल्लाबोल केला.

 

गेवराई तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे हे प्रचारादरम्यान बोलत होते. यावेळी माजी आमदार बदामराव पंडित, पूजाताई मोरे, युवा नेते युद्धजीत पंडित यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे नेते पंढरीनाथ लगड, अण्णासाहेब राठोड, पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे धम्मापाल कांडेकर, अमोल करांडे, आम आदमी पार्टीचे अशोक येडे, शिवसेनेचे हनुमंत इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

गेवराई तालुक्यातील बाग पिंपळगाव, पिंपळगाव कॅम्प, गोपाळवस्ती (बेलगाव), बेलगाव, धोंडराई फाटा, धोंडराई, तळणेवाडी, भोजगव वस्ती, भोजगाव, बोरीपिंपळगाव, उमापुर, हिवरवाडी, महाडूळा फाटा, खळेगाव, वाहेवाडी, माटेगाव, कुंभेजळगाव, रामनगर तांडा, भाट अंतरवली या गावात मतदारांशी संपर्क साधत गाठीभेटी घेतल्या.

error: Content is protected !!