ब्रेकिंग न्युज
कामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजराआयुष्यमान भारत योजनेचा लाभ पांढऱ्या व केशरी कार्ड धारकांना पण – डॉ ओमप्रकाश शेटेजामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागर

आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या आबासाहेब शिंदेंच्या कुटुंबीयांची बजरंग सोनवणेंनी घेतली भेट.

 

 

 

 

बीड / गेवराई

 

मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या माटेगाव (ता. गेवराई) येथील कै. आबासाहेब बालासाहेब शिंदे या तरुणाने आत्महत्या केली होती. या शिंदे कुटुंबीयांची राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी भेट घेवून सांत्वन केले.

 

बीड लोकसभेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे हे गेवराई तालुक्यात प्रचार दौऱ्यावर होते. त्यांनी माटेगाव येथील मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या आबासाहेब बालासाहेब शिंदे यांच्या घरी भेट घेवुन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांनी निवडून आल्यानंतर संसदेत आरक्षण प्रश्नी आवाज उठवू. मराठा आरक्षणावर संसदेत चर्चा करून त्याला वाचा फोडणे हीच खरी आबासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली असेल अशी भावना ही बजरंग बप्पा सोनवणे यांनी व्यक्त केली. यावेळी माजी मंत्री बदामराव आबा पंडित, किसान सेलच्या प्रदेशाध्यक्ष पूजाताई मोरे, अण्णासाहेब राठोड, युवा नेते सभापती युद्धजीत पंडित, अण्णासाहेब राठोड, श्रीनिवास बेदरे, धम्मपाल कांडेकर, माजी सभापती पंढरीनाथ लगड, अमोल करांडे, अमोल सुतार यांच्यासह इंडिया आघडीतील घटक पक्षातील नेते उपस्थित होते.

error: Content is protected !!