ब्रेकिंग न्युज
पंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवन

गेवराई तालुक्यात पैठणचा उजवा कालवा फुटला

गेवराई तालुक्यात पैठणचा उजवा कालवा फुटला

पाणीटंचाईच्या काळात लाखो क्युसेक्स पाणी वाया

माळ्याच्या वस्तीत घुसले पाणी

गेवराई – गेल्या पंचवीस दिवसा पासुन पैठणच्या उजव्या कालव्यात अंत्यत कमी प्रमाणात जायकवाडी धरणातून पाण्याची पातळी झालेली आहे.परिणामी पाण्याचे स्रोत असलेल्या विहीर बोअरवेल यांच्या पाणीपातळीत देखील झपाट्याने घट झालेली आहे.जनावरे,शेती व पिण्याच्या पाण्यासाठी पैठणच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आलेले आहे.मात्र कालव्यातील पाणी वितरीका फुटुन वाया जाते,तर आज गुरुवार दि २६ एप्रील रोजी गेवराई तालुक्यातील तळणेवाडी गावाजवळ माळ्याचा ओढा म्हणुन ओळख असलेला परीसरात उजवा कालवाच फुटला.या मधुन लाखो कुसेस पाणी वाया गेले आहे.अचानक कालवा फुटल्याने जवळील शेतवस्तीवर देखील पाणी घुसले व सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने या परीसरात शेत वस्तीवरील लोंकात भितीचे वातावरण पसरले आहे.हे पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली आहे.कालवा फुटल्याने कालव्यातील पाण्याचा प्रवाह गुळज येथुन बंद केला असल्याचे समजते मात्र,जलसंपदा विभागाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.याच कालव्यावर सी आर चार म्हणून सांडवा पर्याय आहे.पण त्याचे दरवाजे वर खाली घेण्याची कसलीही यंत्रना येथे सज्ज नाही व त्याची देखभालीसाठी व नियंत्रण ठेवण्यासाठी सुविधा असत्या तर पाण्यावर नियंत्रण करता आले आसते असे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.

error: Content is protected !!