ब्रेकिंग न्युज
सकल चर्मकार समाजाचा पंकजाताई मुंडेंना पाठींबाआष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे -प्रदिप थोरवेपंकजाताईच राजकारण सर्व समावेशक ,त्या खासदार होण , बीड जिल्ह्याच्या विकासाचा दरवाजा खुला करणजिल्हा रुग्णालयात ‘एमआरआय ‘ मशिन अभावी तर स्वरातीचे सिटी स्कॅन ४ महिन्यांपासून बंद रूग्णांची हेळसांड  ; शासनकर्ते उदासीन:- डॉ.गणेश ढवळेघुलेचे कार्यकर्ते हाती कमळ धरणार?भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय रुचला नसल्याची चर्चाचारा दरात वाढ जनावरांना बाजाराची वाट पाण्याचीही टंचाई कडब्याचा दर तीन हजारांवरनिलेश लंकेच्या प्रचारार्थ पदाधिकारी व कार्यकर्ते घर ते घर प्रचारबैलजोडी सेवेचे मानकरी वस्ताद सहादु कुऱ्हाडे यांचा सत्कार माऊली मंदिरात ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचा उपक्रमआष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – राम खाडेविकासात्मक नेतृत्व असलेल्या पंकजाताई मुंडे यांना सर्वाधीक मताने विजयी करा -आ.सुरेश धस

गेवराई तालुक्यात पैठणचा उजवा कालवा फुटला

गेवराई तालुक्यात पैठणचा उजवा कालवा फुटला

पाणीटंचाईच्या काळात लाखो क्युसेक्स पाणी वाया

माळ्याच्या वस्तीत घुसले पाणी

गेवराई – गेल्या पंचवीस दिवसा पासुन पैठणच्या उजव्या कालव्यात अंत्यत कमी प्रमाणात जायकवाडी धरणातून पाण्याची पातळी झालेली आहे.परिणामी पाण्याचे स्रोत असलेल्या विहीर बोअरवेल यांच्या पाणीपातळीत देखील झपाट्याने घट झालेली आहे.जनावरे,शेती व पिण्याच्या पाण्यासाठी पैठणच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आलेले आहे.मात्र कालव्यातील पाणी वितरीका फुटुन वाया जाते,तर आज गुरुवार दि २६ एप्रील रोजी गेवराई तालुक्यातील तळणेवाडी गावाजवळ माळ्याचा ओढा म्हणुन ओळख असलेला परीसरात उजवा कालवाच फुटला.या मधुन लाखो कुसेस पाणी वाया गेले आहे.अचानक कालवा फुटल्याने जवळील शेतवस्तीवर देखील पाणी घुसले व सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने या परीसरात शेत वस्तीवरील लोंकात भितीचे वातावरण पसरले आहे.हे पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली आहे.कालवा फुटल्याने कालव्यातील पाण्याचा प्रवाह गुळज येथुन बंद केला असल्याचे समजते मात्र,जलसंपदा विभागाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.याच कालव्यावर सी आर चार म्हणून सांडवा पर्याय आहे.पण त्याचे दरवाजे वर खाली घेण्याची कसलीही यंत्रना येथे सज्ज नाही व त्याची देखभालीसाठी व नियंत्रण ठेवण्यासाठी सुविधा असत्या तर पाण्यावर नियंत्रण करता आले आसते असे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.

error: Content is protected !!