ब्रेकिंग न्युज
मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !स्वाराती रूग्णालयातील मशिन व यंत्रसामुग्री दुरूस्त करून रूग्णांचे हाल थांबवाकार,मोटारसायकल व बैलगाडीच्या तिहेरी अपघातात एक ठार चार जखमीअलंकापुरीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात  अपयशाने खचून न जाता यशाला जिद्द परिश्रमाच्या जोरावर जीवन प्रकाश’माननर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्न

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी शिवसंग्रामच्या वतीने निवेदन सादर.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी शिवसंग्रामच्या वतीने निवेदन सादर.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️दिपक मापारी | रिसोड.
दि.18 – तहसील कार्यालय रिसोड येथे मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य याना रिसोड तहसीलदार यांच्या मार्फत युवक शिवसंग्राम च्या वतीने मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले . सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला नंतर मराठा आरक्षण रद्द करण्यात आले. त्यानंतर आता मराठा समाजाला सरकारने न्याय दयावा , मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात फीस साठी आर्थिक मदत करावी ,कोपरडी येथील आरोपीस लवकरात लवकर फाशी देण्यात यावी व इतर विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले . लवकरात लवकर निर्णय व्हावा अन्यथा पुन्हा एकदा मराठा समाजाला रस्त्यावर उतरावे लागेल हा इशारा ही या वेळी निवेदनात देण्यात आला. यावेळी शिवसंग्राम युवक जिल्हा उपाध्यक्ष शुभम शिंदे , संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रसाद देशमुख , शिवसंग्राम युवक रिसोड तालुका अध्यक्ष गोपाल जाधव योगेश मोरे ,महादेव चोपडे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!