ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान १००० कलशधारी सुवासिनी महिलांची प्रभात फेरी ठरणार लक्षवेधीजिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात…युवकांनी सलोखा , बंधुत्व संबंध जोपासण्याची गरज –  ॲड. सुभाष (भाऊ) राऊतवाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाण

माहु तंबीटकर वाडी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न…

माहु तंबीटकर वाडी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न…

 

कोकण संपादक / भरत सरपरे

म्हाप्रळ प्रतिनिधी / प्रकाश महाडीक

मंडणगड: तालुक्यातील माहु तंबीटकर वाडी येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विविध विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये संदेश तंबीटकर यांच्या घरापासून ते रमेश लाखण यांच्या घरापर्यंत पाखाडी रस्त्याचे भुमीपूजन करण्यात आले. सुमारे २ लाख रुपयांचा निधी या कामासाठी मंजूर झाला असुन लवकरच हे काम पुर्णत्वास जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून या कामाचा पाठपुरावा केल्याने ग्रामस्थ मंडळाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिका-याचा सन्मान करण्यात आला व आभार देखील मानण्यात आले. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून विकासाची गंगा माहु तंबीटकर वाडी साठी आणू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मुजफ्फर मुकादम यांनी आपल्या मनोगतात दिला. केवळ अश्वासन दिली नसून आगामी काळात याही पेक्षा मोठी कामे आपल्या क्षेत्रात करणार असल्याचे देखील सांगितले. या पाखाडी रस्त्याचे भुमीपूजन राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेल चे अध्यक्ष प्रकाश शिगवण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य प्रमोद जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष भाई मालगुंडकर, मंडणगड नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगरसेवक सुभाष सापटे, राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते राजा लेंढे, माहु-बोरघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मंगेश लाखण, पाट ग्रामपंचायतीचे उपसरपंच सतिश दिवेकर, माहु तंबीटकर वाडीचे अध्यक्ष सूर्यकांत नामुगडे व ग्रामस्थ व महिला मंडळ हे या वेळी कार्यक्रमाला उपस्थित होते.

error: Content is protected !!