ब्रेकिंग न्युज
ही निवडणूक म्हणजे आपल्या अस्तित्वाची आणि सन्मानाची लढाई- आ.संदीप क्षीरसागरसंत तुकाराम मंदिर तळेगाव येथे निवासी संस्कार शिबिराचे आयोजनलिंबागणेश येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरीपंकजाताई मुंडेंच्या प्रचारासाठी आ.मुंदडा डोअर टू डोअर मतदारांपर्यंतमादळमोही कोळगाव सर्कलमध्ये बजरंग सोनवणे यांच्या दौर्‍यामुळे मतदारांमध्ये उत्साहपंकजाताईंच्या विजयासाठी डॉ. योगेश क्षीरसागर यांचा विजय संकल्प मेळावातहसीलदार खोमणे साहेब थोडी जनाची नाही तर मनाची तरी राखा व निराधारांची हेडसान थांबवा – राधाकिसन मोटेशारदा कबड्डी अकॅडमीच्या वतीने गेवराईत उन्हाळी कबड्डी प्रशिक्षण शिबिर-रणवीर पंडितजयभवानी शिक्षण संकुलात महाराष्ट्र दिन उत्साहात साजराशिक्षकांविरोधात गंभीर स्वरूपाच्या तक्रारी

माहु तंबीटकर वाडी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न…

माहु तंबीटकर वाडी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न…

 

कोकण संपादक / भरत सरपरे

म्हाप्रळ प्रतिनिधी / प्रकाश महाडीक

मंडणगड: तालुक्यातील माहु तंबीटकर वाडी येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विविध विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये संदेश तंबीटकर यांच्या घरापासून ते रमेश लाखण यांच्या घरापर्यंत पाखाडी रस्त्याचे भुमीपूजन करण्यात आले. सुमारे २ लाख रुपयांचा निधी या कामासाठी मंजूर झाला असुन लवकरच हे काम पुर्णत्वास जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून या कामाचा पाठपुरावा केल्याने ग्रामस्थ मंडळाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिका-याचा सन्मान करण्यात आला व आभार देखील मानण्यात आले. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून विकासाची गंगा माहु तंबीटकर वाडी साठी आणू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मुजफ्फर मुकादम यांनी आपल्या मनोगतात दिला. केवळ अश्वासन दिली नसून आगामी काळात याही पेक्षा मोठी कामे आपल्या क्षेत्रात करणार असल्याचे देखील सांगितले. या पाखाडी रस्त्याचे भुमीपूजन राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेल चे अध्यक्ष प्रकाश शिगवण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य प्रमोद जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष भाई मालगुंडकर, मंडणगड नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगरसेवक सुभाष सापटे, राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते राजा लेंढे, माहु-बोरघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मंगेश लाखण, पाट ग्रामपंचायतीचे उपसरपंच सतिश दिवेकर, माहु तंबीटकर वाडीचे अध्यक्ष सूर्यकांत नामुगडे व ग्रामस्थ व महिला मंडळ हे या वेळी कार्यक्रमाला उपस्थित होते.

error: Content is protected !!