ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

राज्यात कोरोनाचा पुन्हा फैलाव, केंद्र सरकारने राज्य सरकारला केल्या काही सूचना

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै. महाराष्ट्र सूर्योदय

राज्यात कोरोनाचा पुन्हा फैलाव , केंद्र सरकारने राज्य सरकारला केल्या काही सूचना

 

मुंबई(प्रतिनिधी) :- राज्यात कोरोनाचा पुन्हा फैलाव होता दिसत आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला काही सूचना केल्या आहेत. तसेच राज्यात मास्कची सक्ती नसली तरी मास्क वापरण्याचे सांगण्यात येत आहे. परिस्थिती पाहून पुन्हा मास्कसक्तीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात दोन दिवसानी शाळा सुरु होत आहेत. तर काही शाळा या 13 जूनपासून सुरु होत आहेत. कोरोना वाढत असल्याने शाळा सुरु होणार की नाही, याबाबत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे. शाळांबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांबाबत काय निर्णय, राज्य सरकार घेणार याची उत्सुकता आहे. दरम्यान, शाळा सुरु होण्याआधी पुन्हा नवी नियमावली करण्यात येण्याची शक्यता अधिक आहे. तसे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. त्या याबाबत म्हणाल्या, शाळांबाबत एसओपी तयार करणार आहोत.

वर्षा गायकवाड यांनी पुढे सांगितले की, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही. काळजी घेऊन शाळा सुरु करणार आहोत. त्यामुळे शाळा सुरु करताना नवी नियमावली असणार हे आता नक्की झाले आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून शाळा नव्या नियमानुसार सुरु करणार आहोत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिलीआहे

.

error: Content is protected !!