ब्रेकिंग न्युज
घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनआरटीईचा घोळ संपला, उद्यापासून भरता येणार ऑनलाइन अर्ज, हा केला महत्वाचा बदलमहाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी 

वेताळे विविध कार्यकारी सोसायटीच्या तज्ञ संचालकपदी दिपक बोंबले, काळुराम सांडभोर यांची निवड

दैनिक सूर्योदय पुणे
प्रतिनिधी : नीता भोसले
१२ जून २०२२

राजगुरुनगर : वेताळे (ता.खेड) विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या तज्ञ संचालकपदी काळुराम सांडभोर व दिपक बोंबले यांची,  सर्व संचालकांच्या वतीने बिनविरोध निवड करण्यात आली. अशी माहिती संस्थेचे चेअरमन दत्तात्रय भिका बोंबले यांनी दिली.
           वेताळे विविध कार्यकारी संस्थेची पंचवर्षिक निवडणुक खेळीमेळीच्या वातावरणात नुकतीच बिनविरोध पार पडली. त्यानंतर वेताळे येथील ग्रामपंचायत सभागृहामध्ये चेअरमन दत्तात्रय भिका बोंबले यांच्या अध्यक्षेतखाली घेण्यात आलेल्या बैठकीत,  संस्थेच्या मंजुर आदर्श पोटनियम ९ ब अन्वये वरील दोन तज्ञ संचालकांची निवड करण्यात आल्याचे संस्थेचे सचिव उल्हास देवदरे यांनी सांगितले. यावेळी व्हाईस चेअरमन विजय दत्तात्रय बोंबले, संचालक दत्तात्रय भिकाजी बोंबले, चंद्रहार बोंबले, नथु बोंबले, शंकर बोंबले, विजय बोंबले,संचालिका शांताबाई बोंबले, शंकुतला बोंबले शिपाई शिवाजी बोंबले,खंडु बोंबले उपस्थित होते.

प्रतिनिधी : नीता भोसले

 

 

error: Content is protected !!