ब्रेकिंग न्युज
स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनआरटीईचा घोळ संपला, उद्यापासून भरता येणार ऑनलाइन अर्ज, हा केला महत्वाचा बदलमहाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळे

खेड तालुक्यातील रानमळा शाळेतील दोन विद्यार्थ्यांची नवोदयसाठी निवड

राजगुरूनगर (कडूस) : खेड तालुक्यातील रानमळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विराज राजेश दौंडकर व गौरी महेंद्र दौंडकर या दोन विद्यार्थ्यांची पिंपळे जगताप येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीमध्ये प्रवेशासाठी निवड झाल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा ढमाले यांनी दिली. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक सलिम शेख यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर दक्षणा फाऊंडेशनच्या रजिता गुंजाळ , रानमळा शाळेतील सुनंदा ढमाले , बाबाजी शिंदे , कविता बनकर , प्रिया देवरे , सुप्रिया सुकाळे यांचेही मार्गदर्शन लाभले.

रानमळा शाळेतील विद्यार्थी दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा , मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध व शिष्यवृत्ती यासारख्या विविध स्पर्धा परीक्षांमधील यशाबरोबर कला , क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धामध्येही सातत्याने यश संपादन करीत आहेत. यावर्षी प्रथमच जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेतून शाळेच्या दोन विद्यार्थ्यांची निवड झाल्यामुळे रानमळा शाळेच्या लौकीकात भर पडली असून कडूस परीसरातून शाळेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी जीवन कोकणे , विस्तार अधिकारी नंदा पवार , केंद्रप्रमुख भिमराव पाटील , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास शिंदे , उपाध्यक्षा सारीका शिंदे , ग्रामविकास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष यादवराव शिंदे , सरपंच प्रमोद शिंदे , उपसरपंच रोहिणी दौंडकर , जि.रं. शिंदे , बाजीराव शिंदे , शंकर शिंदे , मिलिंद शिंदे , अजय दौंडकर , अरविंद दौंडकर , दशरथ भुजबळ , उल्हास भुजबळ , होनाजी शिंदे , नवनाथ वाघोले , गणेश भुजबळ , नवनाथ थोरात , प्रविण सुकाळे , प्रकाश शिंदे , दत्तात्रय शिंदे , सायली भुजबळ , अक्षदा सुकाळे , स्वप्ना वाघोले , होनाजी गावडे , कविता गावडे , राजेश दौंडकर , महेंद्र दौंडकर यांनी अभिनंदन केले. काळभैरवनाथ मित्र मंडळ , ग्रामस्थ आणि शाळेच्या वतीने दोन्हीही विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला.

error: Content is protected !!