ब्रेकिंग न्युज
आमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

महात्मा गांधी विद्यालयाचे दहावीच्या परीक्षेत उज्वल यश

दैनिक सूर्योदय पुणे

प्रतिनिधी : दीपक बोंबले

21/06/2022

राजगुरुनगर : खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित महात्मा गांधी विद्यालयाचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ९६.९४ टक्के इतका लागला असून विद्यालयाने दैदिप्यमान यश मिळविले आहे. विद्यालयातील एकूण ४५७ विद्यार्थ्यांपैकी ४४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य सुनिल जाधव यांनी दिली.
विद्यालयातील प्रथम पाच क्रमांक, गुण (५०० पैकी) व कंसात टक्केवारी पुढीलप्रमाणे :
१. अंजली संजयकुमार शिरसाट     – ४८७ (९७.४०)
२. ओम नानाभाऊ होजगे     – ४७९ (९५.८०)
२. अनुष्का गुलाब थिटे      – ४७९ (९५.८०)
३. समिक्षा हेमंत पुंडे        – ४७८ (९५.६०)
४. स्वयंम शरद थिगळे      – ४७६ (९५.२०)
५. रिया दत्तात्रय जाधव      – ४७५ (९५.००)
खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर, उपाध्यक्ष अजित लुणावत, मानद सचिव एअर कमोडर गणेश जोशी, शाला समिती अध्यक्ष प्रा.बबनराव थोरात, संचालक हिरामण सातकर, कैलास सांडभोर, विनायक दिक्षित, डॉ. प्रदिप शेवाळे, अॅड संदिप भोसले, प्रदिप कासवा, गणेश घुमटकर, रेखाताई क्षोत्रीय, माणिकताई बिचकर, विद्यालयाचे प्राचार्य सुनील जाधव, संस्थेच्या सर्व संचालक मंडळ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!