ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

शिवसेनेच्या डॅमेज कंट्रोलसाठी संजय राऊत तीन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर

 

नाशिक जिल्ह्यातील दोन शिवसेना आमदार फुटून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्यानंतर आता डॅमेज कंट्रोलसाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे नाशिकमध्ये आज रात्री येणार असून ते तीन दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून असणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी पालकमंत्री छगन भुजबळ हेदेखील नाशिकमध्ये दाखल झाले असून शनिवारी राष्ट्रवादीच्या बैठकीत संवाद साधणार आहेत.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामध्ये नाशिकमधून माजी कृषी मंत्री आमदार दादा भुसे आणि आमदार सुहास कायंदे हे दोघे सहभागी झाले आहेत. जिल्ह्यात हे दोनच शिवसेनेचे आमदार आहेत. या घटनेनंतर जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता असून डॅमेज कंट्रोल करून पक्ष एकसंघ राखण्यासाठी संजय राऊत नाशिकमध्ये येणार आहेत. कार्यकर्त्यांशी ते व्यक्तिगत चर्चा करणार असल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान, माजी पालकमंत्री छगन भुजबळ हेदेखील नाशिकमध्ये दाखल झाले असून शनिवारी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची त्यांनी बैठक बोलावली आहे त्यात ते संवाद साधणार आहेत. आगामी नाही महानगर पालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून याच पार्श्वभूमीवर राऊत यांच्या दौऱ्याकडे पहिले जात आहे.

error: Content is protected !!